google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात भाजपचा स्थापना दिवस उत्साहात साजरा - चेतनसिंह केदार सावंत

Breaking News

सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात भाजपचा स्थापना दिवस उत्साहात साजरा - चेतनसिंह केदार सावंत

सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात भाजपचा स्थापना दिवस उत्साहात साजरा - चेतनसिंह केदार सावंत 


सांगोला (तालुका प्रतिनिधी): सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात भाजपचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. 

यावेळी पाच विधानसभा मतदारसंघातील १४ मंडलामध्ये २०५६ पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

या ऑनलाइन कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संघटन पर्वचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन केले 

असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली. 

      भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाचे सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी मार्गदर्शन करताना दीड कोटी सदस्य नोंदणी झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. 

सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात २ लाख ७८ हजार ९१३ सदस्य नोंदणी झाली आहे. माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी भाजपच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. 

     भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगोला तालुक्यातील जुजारपूर येथे भाजप पक्ष कार्यालयात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले.

 यावेळी भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ऑनलाइन कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, बाळाप्पा येलपले, लक्ष्मण येलपले,

 अनिल चौगुले, विनायक बाबर, विष्णू हिप्परकर, मोहन बजबळे, सागर बजबळे, विश्वास करडे, विजय पवार, गणेश घाडगे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments