google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दुर्दैवी घटना..उसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू सांगोला तालुक्यातील घटना..

Breaking News

दुर्दैवी घटना..उसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू सांगोला तालुक्यातील घटना..

दुर्दैवी घटना..उसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू सांगोला तालुक्यातील घटना..


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : उसाला पाणी देण्यासाठी मोटर चालू करण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याला विजेचा शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

ही घटना मंगळवारी मध्यरात्री १ च्या सुमारास खिलारवाडी (ता. सांगोला) येथील शिंदे वस्ती येथे घडली.

धनाजी दामोदर बागल (वय २८) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.याप्रकरणी सांगोला ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खबर दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.

मयत धनाजी बागल या तरुण शेतकऱ्याचे अवघ्या दहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. दरम्यान मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर शिंदे वस्ती येथील शेतात गेले. 

मोटर चालू करण्यापूर्वी रात्री १२:३० च्या सुमारास स्वतःच्या मोबाइल वरील स्टेटस पाहून मोबाइलवर स्टेट्स ठेवून बंद केला. 

यावेळी उसाला पाणी देण्यासाठी मोटर चालू करताना विजेचा शॉक लागून जागीच पडले होते.

Post a Comment

0 Comments