सांगोला तालुक्यातील घटना.. हटकर मंगेवाडी येथे टेंभूचा कालवा फुटला:
५५ लाख रुपयांचे नुकसान; कालवा परिसरातील शेतकऱ्यांनाही फटका
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : अनोळखी व्यक्तीने टेंभू योजनेच्या कालव्याचे गेट बंद केल्याने पाणी तुंबल्याने निर्माण झालेल्या फुगवट्यामुळे कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना हटकर मंगेवाडी (ता.सांगोला) येथे मंगळवारी १ घडली.
या घटनेत कालवा उघडल्याने शासनाचे तब्बल ५५ लाख रुपयांचे तर या परिसरातील शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर आली आहे.
टेंभू योजनेचे शाखा अभियंता महेश मधुकर पाटील यांनी पोलिसात दिलेल्या माहिती दिली आहे. सध्या टेंभू योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू
असून यामधून सांगोला तालुक्याला पाणी सोडले होते. सोमवारी ३१ मार्च रोजी रात्री बाराच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने टेंभू योजनेच्या कि.मी. ३६.५२० येथील कालव्याचे
सीआर गेट बंद केल्याने मंगळवारी पाण्याचा फुगवटा होऊन हटकर मंगेवाडी गावाच्या हद्दीतील कालवा कि.मी. ३६.०० मध्ये फुटल्याचे पहाटे पाचच्या सुमारास निदर्शनास आले.
ही बाब लक्षात आली असता संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ कालव्यामधील पाणीपुरवठा थांबविला.
मात्र तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाया जाऊन कालव्याचे तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. १६० क्युसेक वेगाने टेंभू योजनेचे पाणी सांगोला तालुक्यासाठी सुरू होते.
मात्र अचानक या मार्गात अज्ञात इसमाने दरवाजा टाकून पाणी अडविल्याने कालवा फुटून ऐन उन्हाळ्यात सुमारे १० लाख घनफूट इतके पाणी वाया गेले.
अचानक हे पाणी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात आणि शेतात घुसल्याने पिके आडवी होऊन तसेच शेतकऱ्यांचे शेत वाहून जाऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
0 Comments