google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नाला यश 4 एप्रिल रोजी वासूद येथील रेल्वे पुलाच्या खालील भुयारी मार्गाच्या काँक्रीटी करणाला सुरूवात

Breaking News

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नाला यश 4 एप्रिल रोजी वासूद येथील रेल्वे पुलाच्या खालील भुयारी मार्गाच्या काँक्रीटी करणाला सुरूवात

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नाला यश 4 एप्रिल रोजी वासूद येथील रेल्वे पुलाच्या खालील भुयारी मार्गाच्या काँक्रीटी करणाला सुरूवात   


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला/प्रतिनिधीः सांगोला तालुकयातील वासूद ते सूतगिरणी जाणार्‍या रेल्वे पुलाच्या खालच्या भुयारी मार्गावरील रस्त्यावर पाणी साचून जाणा-येणार्‍या नागरीकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत होते.

त्यामुळे माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी रेल्वे मंत्री व विभागीय रेल्वे प्रबंधकाकडे वारंवार मागणी केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने वासूद ते

 सुतगिरणी रस्त्याचे रेल्वेच्या पुलाखाली भुयारी रस्ता क्राँक्रीटीकरणाचे काम मंजूर केले आहे.  व प्रत्यक्षात 4 एप्रिल रोजी या भुयारी रस्ता क्राँक्रीटी करणाचे काम सुरू होणार असल्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने काढले आहे. 

वासुद ग्रामपंचायत क्षेत्रातील वासुद गावातील रहिवाशांना रेल्वे पुलाखालील खराब रस्त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. वासुद ते सुतगिरणी (मिरज रोड) या मार्गावरील रेल्वे पुलाखालील रस्ता अतिशय वाईट अवस्थेत आहे.  

पावसाळ्यात रस्त्याच्या वाईट स्थितीमुळे, पावसाळ्यात तो रस्ता पाण्याखाली जातो, ज्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यात मोठी अडचण येते. 

गावातील रहिवाशांना स्मशानभूमीत जाण्यासाठी खूप अडचणी येतात. शेतकर्‍यांना त्यांच्या शेतात ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणी येतात. या भागातील रहिवाशांसाठी प्रवासाचे मार्ग अत्यंत कठीण झाले आहेत.

 खराब रस्त्यांमुळे आपत्कालीन सेवा  विस्कळीत होत आहेत. तरी वरील समस्या लक्षात घेऊन वासूद ते सुतगिरणी (मिरज रोड) पर्यंतच्या रेल्वे पुलाखालील रस्त्याचे काँक्रीटीकरण लवकरात लवकर करण्याचे निर्देश द्या. 

अशा आशयाचे निवेदन खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिल्याने तात्काळ रेल्वे प्रशासनाने दखल घेवून वासूद ते सूतगिरणीपर्यंतच्या भुयारी रस्त्याचे काम 4 एप्रिल पासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

Post a Comment

0 Comments