मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका,
आशा वर्कर यांना मिळणार 'इतके' रुपये मानधन; भत्ता वाटपाची प्रक्रिया सुरू
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामसेवक, सीआरपी यांच्यावर सोपविण्यात आले होती.
प्रत्येक भरण्यात आलेल्या अर्जाला पन्नास रुपये भत्ता देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली होती. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यासाठी शासनाकडून १ कोटी ३७ लाख ७७ हजार ७०० रुपये प्राप्त झाले आहेत.
जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह इतर यंत्रणांना भत्ता वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडे कार्यरत असणाऱ्या ३ हजार २८३ अंगणवाडी सेविकांनी २ लाख २१ हजार ९४ तर २०४ मदतनिसांनी ९ हजार १३५ अशा एकूण २ लाख ३० हजार २२९ लाडक्या बहिणींचे अर्ज यशस्वीरित्या भरले होत.
प्रति अर्ज पन्नास रुपये प्रमाणे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे १ कोटी १५ लाख ११ हजार ४५० रुपये शासनाकडे येणे होते.
ती रक्कम जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडून योजना संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दोन दिवसात सीडीपीओ मार्फत वाटप : मिरकले
सोलापूर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी ज्या
लाडक्या बहिणींचे अर्ज यशस्वीरित्या भरल्या आहेत. त्यांचे प्रति अर्ज पन्नास रुपयेप्रमाणे मानधनाचे अंतिम बिल मंजूर झाले आहे.
दोन दिवसात तालुकास्तरावरून सीडीपीओ मार्फत वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे. अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली.
0 Comments