खळबळजनक घटना...किडेबिसरी गावच्या माजी सरपंच यांचा प्रताप ; ग्रामपंचायतीची केबल सहित मोटरपेटी व पाईप रात्रीचीच केली लंपास
नागरिकांच्या तक्रारीनंतर तब्बल 3 महिन्यानंतर काही साहित्य केले माघारी ; ग्रामपंचायतीला आली उशिरा जाग 7 दिवसात संपूर्ण साहित्य जमा करण्याबाबत काढले नोटीस
सांगोला : सरपंच पदावर कार्यरत असताना, ग्रामपंचायतीची विद्युत पंप, केबल, मोटर पेटी व पाईप तत्कालीन सरपंचाने कर्मचाऱ्यांकडून चावी घेऊन रात्रीचीच घरी नेली. याबाबत गावातील नागरिकांनी पंचायत समितीकडे तक्रार केली.
यावर तब्बल तीन महिन्यानंतर त्यातील काही साहित्य माजी सरपंचांनी ग्रामपंचायतीला परत केले आहे उर्वरित साहित्य येत्या सात दिवसात ग्रामपंचायतीला परत केले नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल याबाबतची नोटीस ग्रामपंचायतीने काढली आहे.
शोभा मारुती घागरे ग्रामपंचायत किडेबिसरी. ता. सांगोला असे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचे नाव आहे. अखेर उशिरा का होईना नागरिकांच्या तक्रार नंतर ग्रामपंचायतीला जाग आली.
दरम्यान ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी व पंचायत समिती प्रशासन मागील तीन महिन्यापासून नेमकी कशाची प्रतीक्षा करीत होते हा संशोधनाचा भाग उरला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १३ डिसेंबर २०२४ रोजी शोभा मारुती घागरे या किडेबिसरी गावच्या सरपंच या पदावर कार्यरत असताना ग्रामपंचायत कार्यालयात असणारे
ग्रामपंचायत मालकीचे साहित्य (विद्युत पंप १ नग, केबल, मोटर पेटी व ३" पाईपा ७ नग ) आपल्या मुलाकरवी रात्रीच्या वेळेस ग्रामपंचायत
कर्मचाऱ्याकडून कार्यालयाच्या चाव्या काढून घेऊन खाजगी वाहनाने आपल्या घरी घेऊन गेले होते. त्याबाबत ग्रामपंचायत कर्मचारी यांनी ग्रामपंचायतीस लेखी कळविलेले होते.
तरीही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याने, सदरील विषयाबाबत मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिति सांगोला यांचेकडे गावातून लेखी तक्रार दाखल
झालेनंतर ३" पाईपा ७ नग व्यतिरिक्त इतर साहित्य आणून माजी सरपंचांनी ग्रामपंचायत कार्यालयात आणून ठेवल्या आहेत. सदरील साहित्य बाबत मा. गटविकास अधिकारिसो यांचेकडे लेखी स्वरुपात तक्रार दाखल झालेली
असल्याने सदरचे संपूर्ण साहित्य पंचायत समिति स्तरावरील अधिकाऱ्यांसमक्ष पंचनामा करून जमा करून घेणे आवश्यक असलेने उर्वरित साहित्य तात्काळ ७ दिवसात ग्रामपंचायत कार्यालयात आणून जमा करावे. असे नोटीस ग्रामपंचायत ने काढली आहे.
जेणेकरून पंचायत समिति कार्यालयास तसा अहवाल सादर करून पंचनाम्याची मागणी करता येईल. सदरचे उर्वरित साहित्य आपण ग्रामपंचायतीत जमा न केल्यास आपलेविरुद्ध योग्य ती कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल अशा पद्धतीची नोटीस आता
ग्रामपंचायतीने माजी सरपंच यांना काढले आहे. यावरून तब्बल तीन महिने प्रशासन नेमकी कशाची प्रतीक्षा करीत होते याबाबत गावांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे.
गावचा सरपंच हा ग्रामपंचायतीचा पदसिद्ध कार्यकारी प्रमुख असतो. गावच्या विकासाला चालना देण्यासाठी व गावाला जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी सरपंच यांची भूमिका आणि योगदान महत्त्वाचे असते.
परंतु अनेकदा गावच्या विकासापेक्षा स्वतःचा विकास करण्याकडे सरपंच यांचा अधिक कल असल्याचे आरोप प्रत्यारोप होत आहेत. अर्थात असाच काहीसा प्रकार किडेबिसरी येथे घडला आहे.
तत्पूर्वी गावातील नागरिकांनी जागरूकता बाळगल्याने व त्यासंबंधी थेट पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्याने हा प्रकार उघडकीस आला.
आणि त्यानंतर ग्रामपंचायतने कारवाईची पावले उचलली. अखेर नागरिकांच्या तक्रारीनंतर तीन महिन्यानंतर का होईना प्रशासनाला जाग आली. अशीच प्रतिक्रिया गावातील नागरिकांमधून उमटत आहे.
0 Comments