सोलापूर जिल्ह्यातील ४०७५ पैकी १३६५ जणांचे परवाने रद्द करावेत,
असा प्रस्ताव पोलिस अधीक्षक कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार स्थानिक पोलिसांनी संबंधितांना नोटीस बजावल्या आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मयत ३० जणांचे शस्त्र परवाने कायमचे रद्द केले आहेत. तर एका व्यक्तीने दहावेळा मुदतवाढ देऊनही शस्त्र खरेदी न केल्याने त्यांचाही परवाना रद्द केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील साडेतीन हजार जणांनी स्वत:कडील शस्त्रे लोकसभा निवडणुकीवेळी पोलिस ठाण्यांमध्ये जमा केली होती. त्यानंतर सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक झाली,
तरीदेखील सुमारे साडेतेराशे जणांनी शस्त्रे नेलीच नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिस ठाण्यांकडून संबंधितांना शेवटची नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले.
त्या एक हजार जणांचे परवानेही रद्द होण्याची शक्यता आहे. चपळगाव (ता. अक्कलकोट) येथील एकाने २००४ मध्ये शस्त्र परवाना घेतला, २०२० पर्यंत परवान्याचे नुतनीकरण केले,
पण त्यांनी शस्त्र विकत घेतले नव्हते. त्यांनी पैसे नसल्याने शस्त्र खरेदी न केल्याचा जबाब दिला आणि त्यांना पुन्हा मुदतवाढ दिली, तरीदेखील त्यांनी शस्त्र न घेतल्याने त्यांचाही परवाना रद्द करण्यात आला आहे.
0 Comments