google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, भिमनगर सांगोला यांची बैठक संपन्न.

Breaking News

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, भिमनगर सांगोला यांची बैठक संपन्न.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, भिमनगर सांगोला यांची बैठक संपन्न.


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ भिमनगर सांगोला नूतन अध्यक्षपदी  नरेश बनसोडे, खजिनदारपदी प्रवीण बनसोडे तर सचिवपदी  विकास बनसोडे यांची सर्वानुमतेने निवड करण्यात आली.

सांगोला/प्रतिनिधी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ 2024-25 ची वार्षिक अहवाल बैठक 18 मार्च रोजी सायंकाळी संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षपदी रजि. मंडळाचे अध्यक्ष तानाजीबापू बनसोडे होते. 

यावेळी सन 2024-25 च्या जमा-खर्चाचे अहवाल वाचन करण्यात आले. या अहवालाचे वाचन सहसेक्रेटरी रूपेश जगन्नाथ बनसोडे यांनी केले. या अहवालास सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.

 त्यानंतर 2025-26 या वर्षाकरिता रजि. मंडळाचे अध्यक्ष तथा बैठकीचे अध्यक्ष तानाजीबापू बनसोडे यांच्या परवानगीने नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या नूतन कार्यकारिणीला सर्व संचालकांनी मान्यता दिली. 

सन 2025-26 या वर्षाकरिता अध्यक्षपदी नरेश बापूसाहेब बनसोडे, उपाध्यक्षपदी महेश सुरेश प्रक्षाळे, राजू जालिंदर माने,

 विनोद विक्रम बनसोडे, स्वप्नील संभाजी कांबळे, सोमनाथ शिवाजी बनसोडे यांची तर खजिनदारपदी प्रविण तुकाराम बनसोडे, सहखजिनदार रूपेश जगन्नाथ बनसोडे,

 आकाश प्रकाश आठवले यांची तसेच सचिवपदी विकास नाना बनसोडे, सहसचिवपदी विनायक भगवान जावीर व विजय अनिल माने यांची तर कार्याध्यक्षपदी रणजित राजरत्न बनसोडे यांची निवड करण्यात आली. 

कार्यकारिणी सदस्य म्हणून जयश्री किशोर बनसोडे, रेश्मा दिपक बनसोडे, रतन संभाजी बनसोडे, रूपाली अशोक काटे, जयश्री नारायण कसबे, अविनाश आप्पा बनसोडे, अनिल दिनकर बनसोडे, रामा सुरेश बनसोडे, अमित सतिश सावंत, वैभव यशवंत भोरकडे, 

अतुल दिलीप बनसोडे, भिमराव प्रकाश बनसोडे, प्रविण गुणवंत जगधने, जय जोती बनसोडे, नानासाहेब महादेव सोनवणे, रघुनाथ(तात्या) गणपत शिवशरण यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर प्रसिध्दी प्रमुखपदी बापूसाहेब चंदू ठोकळे यांची निवड करण्यात आली. 

या सर्व नूतन कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांना सर्व समाजाच्यावतीने मान्यता देण्यात आली. नूतन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. 

यावेळी असंख्य भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments