गुढीपाडव्याच्या दिवशी वृत्तपत्र विक्री बंद चा इशारा; सांगोला तालुका वृत्तपत्र विक्रेत्याच्या बैठकीत निर्णय
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला / प्रतिनिधी - सांगोला तालुका वृत्तपत्र विक्रेत्याची बैठक बोत्रे कॉम्प्लेक्स सांगोला येथे संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी गुढीपाडव्याच्या दिवशी वृत्तपत्र विक्री बंद ठेवण्याचा
निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता वृत्तपत्र विक्रेता गेली अनेक वर्षे झाले घरोघरी फिरून पेपर वाटप करतात व कोरोनाच्या काळापासून विक्रेते अडचणीत आले आहेत
तसेच अनेक वर्षे झाले 30 टक्के कमिशन द्या याबाबत वृत्तपत्र कंपनीकडे मागणी केली आहे. परंतु याकडे अद्याप लक्ष दिले नाही व त्यामुळे व्यवसाय बंद करण्याच्या मनस्थितीत बरेच वृत्तपत्र विक्रेते आहेत,
व याबाबतची मागणी सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेने ही केली आहे व त्याची दखल न घेतल्यास येत्या 30 मार्च रोजी सांगोला तालुका वृत्तपत्र विक्री बंद करण्याचा इशारा सर्वानुमते बैठकीत घेण्यात आला आहे.
यावेळी जे पेपर 30 टक्के कमिशन देतील याचा विचार करावा असे मत संघटनेचे उपाध्यक्ष अमोल बोत्रे व सचिव उत्तम काका चौगुले यांनी मत व्यक्त केले. सदर प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी सुखदेव पवार,
संतोष बनसोडे, रेवणसिद्ध नकाते, रामचंद्र कुंभार, भानुदास जाधव, बाबुराव पवार, अमोल बोत्रे, रविराज शेटे, विकास बोत्रे, डोंगरे काका व विक्रेते बांधव उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार रेवणसिद्ध नकाते यांनी मानले.
0 Comments