google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कार्यातपस्वी स्व. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगोला तालुक्यात विविध कार्यक्रम

Breaking News

कार्यातपस्वी स्व. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगोला तालुक्यात विविध कार्यक्रम

कार्यातपस्वी स्व. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगोला तालुक्यात विविध कार्यक्रम


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला / तालुका प्रतिनिधी सांगोला तालुक्याचे कार्यतपस्वी आमदार स्व. काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य 

साधून सांगोला शहर आणि संपूर्ण तालुक्यात शुक्रवार दि २८ मार्च रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करून स्व आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे कार्य करणार असल्याचे ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील यांनी सांगितले. 

दरवर्षी स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पुण्यतिथीनमित्त संपूर्ण 

सांगोला शहर आणि तालुक्यात विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबविले जातात. त्याचप्रमाणे यंदाही शुक्रवारी दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

 महूद बु. येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महुद येथील विद्यार्थ्यांना महूद ग्रामस्थांच्या वतीने शालेय साहित्यांचे व खाऊचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच एखतपुर ग्रामस्थांच्या वतीने 

एखतपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात येणार आहे.

 जवळा ग्रामस्थांच्या वतीने प्राथमिक मुलांची शाळा क्र. १ येथे समस्त ग्रामस्थांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

या शिबिरात जवळा व पंचक्रोशीतील सर्व गोरगरीब नागरिकांसाठी आरोग्य तपासणी आणि निदान शिबिर आयोजित केले आहे.

 तर, घेरडी ग्रामस्थांच्या वतीने घेरडी येथील आश्रमशाळा तसेच जिल्हा परिषद

 प्राथमिक शाळा मधील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाऊ वाटप करण्यात येणार आहे.

 कडलास ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात येईल. 

नाझरे ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खाऊ तसेच फळांचे वाटप करण्यात येणार आहे. 

शुक्रवार दि २८ मार्च रोजी कोळा ग्रामस्थांच्या वतीने गोपाळपूर ता. पंढरपूर येथील मातोश्री आश्रमात असणाऱ्या सर्व निराधार लोकांना मोफत आणि रुचकर भोजन देण्यात येणार आहे.

 तर सांगोला शहरवासी यांच्या वतीने शहरातील मातोश्री वृद्धाश्रम येथे असणाऱ्या निराधार वयोवृद्ध नागरिकांना भोजनाचे सर्व साहित्य देण्यात येणार आहे. 

संपूर्ण सांगोला शहर आणि तालुक्यात स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त साळुंखे पाटील परिवारावर प्रेम करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात

 सामाजिक उपक्रम राबवून स्वर्गीय काकासाहेब साळुंखे पाटील यांची पुण्यतिथी साजरी करावी असे आवाहन ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments