मोठी बातमी...महुद येथे ट्रकची तोडफोड करून कोयत्याने मारहाण सांगोला तालुक्यात खळबळ..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्यातील महुद येथे ट्रकची तोडफोड करीत घरात घुसून कोयता, दगड आणि लाथाबुक्क्याने मारहाण करण्यात आली.
या केलेल्या मारहाणीत तिघेजण जखमी झाले. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.
दरम्यान या प्रकरणी ४ जणांविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तानाजी सुनील लवटे त्याचे दोन भाऊ विकास आणि शिवाजी लवटे,
अशोक मारुती इरकर आणि सुनील लवटे (सर्व रा. महूद) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत संजय बिरा घोडके (वय २४ रा.महुद) यांनी यासंदर्भात पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घोळके यांची घरासमोर लावलेल्या ट्रकची तोडफोड केली. आणि त्यांच्या घरात घुसून कोयता आणि लाथा बुक्क्याने मारहाण केली.
त्यात संजय आणि त्यांचे भाऊ अजय घोडके हे दोघे जखमी झाले.
0 Comments