google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शेतकऱ्यांना दिवसा वीज! 'या' ग्राहकांना मोफत घरगुती लाईट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत मोठी घोषणा

Breaking News

शेतकऱ्यांना दिवसा वीज! 'या' ग्राहकांना मोफत घरगुती लाईट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत मोठी घोषणा

शेतकऱ्यांना दिवसा वीज! 'या' ग्राहकांना मोफत घरगुती लाईट;


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत मोठी घोषणा 

बळीराजा मोफत वीज जाहीर केल्यानंतर याचा 45 लाख शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

सर्वाधिक म्हणजे 16 हजार मेगावॅट वीज कृषीला देणार महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. डिसेंबर 2026 पर्यंत सर्व शेतकऱ्यांना वीज ही सोलरच्या माध्यमातून दिली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांना दिवसा 365 दिवस वीज मिळणार आहे. कोणालाही रात्री पिकाला पाणी सोडण्याची गरज पडणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. 1 कोटी 34 लाख ग्राहकांना मोफत घरगुती लाईट देणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

2030 पर्यंत 52 टक्के वीज ही अपारंपारिक उर्जेतुन असणार आहे. डेटा सेंटर ज्यांच्याकडे आहे तो सर्वात श्रीमंत आहे. त्यांना सर्वात महत्वाची वीज आहे. त्यांना वीज देण्याचा प्रयत्न केला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दरवर्षी विजेचे दर 9 टक्के वाढत असतात. 1 लाख 13 हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विजेचे भाव कमी होत जाणार आहेत. पाच वर्षात 24 टक्क्यांनी विजेचे दर कमी करत आहेत.

95 टक्के घरगुती विजेत दिलासा देणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. स्मार्ट मिटर लावला तर दिवसा 10 टक्के वीज बिलावर रिबीट येणार असल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात विक्रमी सोयाबीन खरेदी

यावेळी महाराष्ट्रात विक्रमी सोयाबीन खरेदी झाली आहे. मध्य प्रदेश हे सर्वाधिक सोयाबीन उत्पादक राज्य आहे. मात्र, सर्वात जास्त खरेदी ही महाराष्ट्रात केली आहे. आतापर्यंत सर्वाधिक सोयाबीन खरेदीचा रेकॉर्ड मोडला आहे.

काही लोकांची खरेदी राहीली आहे. तूर खरेदी करायला गोडाऊन नाही. त्यामुळं खासगी गोडाऊन घेऊन आपण तूर खरेदी केली आहे. सिंचनाच्या क्षेत्रात मोठं काम आपण केलं असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रातला कायमस्वरुपी दुष्काळ मुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प

महाराष्ट्रातला कायमस्वरुपी दुष्काळ मुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे. सात जिल्ह्यातील 10 लाख एकर जमिनीला फायदा होईल. 

426 किमीचा नवीन कालवा तयार करत आहे. प्रकल्प अहवाल तयार होऊन काम सुरु करायला दोन वर्ष लागतील. मराठवाड्याला पाणी वळवण्यासाठी आपण निविदा काढली आहे.

जायकवाडी वरील बाजूस धरणे बांधली आहेत. त्यामुळं तूट निर्माण झाली आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळं वाद निर्माण होतात, ते बंद होतील.

नाशिक, अहमदनगर, संभाजीनगर हे वाद मिटतील. पिण्यासाठी मराठवाड्यात पाणी उपलब्ध होईल. संभाजीनगर व जालना हे नवीन औद्योगिक क्लस्टर निर्माण होत आहे. त्याला या पाण्याचा फायदा होईल असे मुख्यमंत्री म्हणाले.

Post a Comment

0 Comments