धक्कादायक...‘माझे हात-पाय तोडा, पण माझ्या लेकरांसाठी जिवंत सोडा’
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ आणि फोटोबीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अनेक बाबी समोर येत आहे. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ
आणि फोटो दोषारोपत्रातून समोर आल्यानंतर, लोकांमध्ये प्रचंड असंतोष दिसून आला होता. आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो समोर आल्यानंतर जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत होता. त्यामुळेच धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
शोध पथकाने सादर केलेल्या दोषारोप पत्रातून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यावेळेस आरोपी सुदर्शन घुले आणि त्याचे दोन साथीदार संतोष देशमुख यांना मारहाण करत होते,
त्यावेळेस संतोष देशमुख यांनी ‘माझे हात-पाय तोडा, पण माझ्या लेकरांसाठी जिवंत सोडा’, अशी विनवणी केली होती. तरीही देशमुख यांना अत्यंत क्रूरपणे मारण्यात आले. मारहाणीच्या दरम्यान ‘बोलsss सुदर्शन घुले सर्वांचा बाप आहे’
असे ओरडत देशमुख यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याचे दाखवणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओंमध्ये संतोष देशमुख यांना तीन तास बेदम मारहाण केली जात
असल्याचे दिसून येत आहे. या अमानुष मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे सीआयडीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या नव्या व्हिडीओमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. संतोष देशमुखांच्या हत्येचे व्हायरल झालेल्या फोटोंचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.
0 Comments