मोठी बातमी..सांगोला तालुक्यातील मठवस्ती येथे चारचाकी व मोटारसायकल अपघात; एकजण ठार
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
मोटारसायकल आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक झाल्याने कटफळ येथील धनाजी दुधाळ हा तरुण मृत्युमुखी पडला आहे.
तर त्याची आई, पत्नी व मुलगा असे तिघेजण या अपघातामध्ये जखमी झाले आहेत.
हा अपघात रविवार दि. २३ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मठवस्ती येथे झाला आहे.
याबाबत मयत धनाजी लक्ष्मण दुधाळ याचा चुलत भाऊ शिवाजी दुधाळ यांनी सांगोला पोलिसात खबर दिली आहे.
कटफळ येथील धनाजी लक्ष्मण दुधाळ हे आई, पत्नी व मुलाला घेऊन दवाखान्यातील नातेवाईकांना भेटण्यासाठी मोटर सायकल क्रमांक वरून सांगोल्याकडे निघाले होते.
त्याचवेळी सांगोला ते कटफळ रोडवरील मठवस्ती बागलवाडी येथील रस्त्यावर सांगोल्याहून पळशी इकडे निघालेले चार चाकी वाहन क्रमांक हे निघाले होते. या चार चाकी वाहनाची व मोटर सायकलची धडक झाल्याने
या अपघातात मोटरसायकल वरील चौघेही जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
मात्र तेथील डॉक्टरांनी या अपघातामध्ये धनाजी दुधाळ हा उपचारापूर्वीच मयत झाला असल्याचे सांगितले.
0 Comments