धक्कादायक..गर्लफ्रेंडला लाखो रुपये उसने दिले, पैसे मागताच योगेशला संपवले प्रेयसी रोशनी
हिने आई आणि साथीदारांच्या मदतीने...सातारा जिल्ह्यातील घटना
राज्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सातारा जिल्ह्यातील दहिवडी
पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीने आपल्या आईच्या मदतीने प्रियकराचा निर्घृण खून केला.
आरोपी प्रेयसी एवढ्यावरच थांबली नाही तर तिने प्रियकराचा मृतदेह कारसह कालव्यात ढकलून दिला.
याप्रकरणी मयताच्या भावाने दहिवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रेयसीसह तिची आई आणि इतर दोन साथीदारांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
योगेश पवार असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील रहिवासी आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्याचे याच परिसरात राहणाऱ्या रोशनी नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते.
प्रेम संबंध सुरू असताना योगेशने आपल्या प्रेयसीला लाखो रुपये हात उसने दिले होते. याच पैशांवरून मागील काही दिवसांपासून रोशनी आणि योगेश यांच्यात वाद सुरू होता.
घटनेच्या दिवशी मंगळवारी १८ मार्चला आरोपी रोशनीने योगेशला फोन केला. मला तुला भेटायचे आहे आणि तुझ्याकडून घेतलेले पैसे परत द्यायचे आहेत, अशी बतावणी केली
आणि योगेशला नरवणे येथे बोलावून घेतले. योगेशही नेहमीप्रमाणे रोशनीला भेटायला गेला. पण त्याच्यासोबत मोठा घात झाला.
योगेश भेटायला गेल्यानंतर आरोपी रोशनीसह तिची आई पार्वती माने आणि इतर पाच जणांनी योगेशवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला.
हा हल्ला इतका भयंकर होता की योगेशचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला.
0 Comments