आलदर हॉस्पिटलच्या वतीने आलदरवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
डॉ. महावीर महादेव आलदर यांच्या आलदर हॉस्पिटलच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलदरवाडी (उदनवाडी) येथे
आज दि. २९ मार्च रोजी बालकांचे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचा ५० रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी डॉ. महावीर आलदर यांनी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या संदर्भात रुग्णांना व त्यांच्या पालकांना आरोग्यांविषयी माहिती दिली.
तसेच यावेळी त्यांनी लहान बालकांना होणारे आजार व घेण्याची काळजी व आलदर हॉस्पिटल मधे नवजातशिशु अतिदक्षता विभाग, लहान बाळासाठी अतिदक्षता विभाग व सर्जरी विभागातील रुग्णांसाठी आलदर हॉस्पिटल हे २४ तास आपल्या सेवेत
तयार आहे. गरीब व गरजू रुग्णांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करत सध्या योजनेअंतर्गत गरीब व गरजू रुग्णांचा भरपूर फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात उदनवाडी परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घेतला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पतंगराव बाबुराव बाबर, उपशिक्षक शिवाजी आण्णा आलदर, अंगणवाडी सेविका आनंदी धोंडीबा आलदर,
सौ.मंगल रामचंद्र पांढरे, पॅरास्टाफ- नितीन भोसले,विजय अवघडे यासह बहुसंख्य पालक उपस्थित होते.
0 Comments