खळबळजनक.. तुझ्या माहेरच्यांनी लग्नात मानपान केला नाही, असे बोलून विनाकारण शिवीगाळ करत,
उपाशी ठेवून आयफोन घेण्यासाठी विवाहितेचा छळ चौघांविरोधात सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:- स्वयंपाक येत नाही, घरातील कामे नीट करत नाहीस तसेच, तुझ्या माहेरच्यांनी लग्नात मानपान केला नाही, असे बोलून विनाकारण शिवीगाळ करत,
उपाशी ठेवून शिळे अन्न खाण्यासाठी देऊन एका विवाहितेचा मानसिक छळ करून, आयफोन मोबाईल घेण्यासाठी माहेरहून १ लाख रुपये घेवून ये,
असा तगादा लावून छळ केला. याप्रकरणी विवाहितिने सांगोला पोलीसात पती, सासरा, सासू व नणंद अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दिनांक ५ मार्च रोजी सौ. रविना पद्यभुषण खरात (वय २८ रा. सलगरे ता. मिरज जि. सांगली) यांनी पती पद्यभुषण खरात, सासरे भाऊसाहेब खरात,
सासु सौ. साधना ( राजाबाई ) खरात तिघे रा. सलगरे ता. मिरज जि. सांगली सध्या खैरापाडा (बोईसर ) जि. पालघर तसेच नणंद तेजस्वीनी आकाश माने रा. धनगर गल्ली / ७ वानलेस वाडी ता. मिरज जि. सांगली यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
0 Comments