google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरात खळबळ!दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी मिळून तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवून आणि डोळ्यात चटणी टाकून पिग्मी एजंटला शस्त्राचा धाक दाखवून पैशाची बॅग पळविली

Breaking News

सांगोला शहरात खळबळ!दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी मिळून तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवून आणि डोळ्यात चटणी टाकून पिग्मी एजंटला शस्त्राचा धाक दाखवून पैशाची बॅग पळविली

 सांगोला शहरात खळबळ!दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी मिळून तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवून


आणि डोळ्यात चटणी टाकून पिग्मी एजंटला शस्त्राचा धाक दाखवून पैशाची बॅग पळविली

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी मिळून तीक्ष्ण हत्याराचा धाक दाखवून आणि डोळ्यात चटणी टाकून पिग्मी एजंटच्या हातातून बॅग पळविली.चौघांपैकी एकाने पिग्मी एजंटच्या मानेवर, पाठीवर चावा घेऊन जखमी केले.

ही घटना काल सोमवारी रात्री ९:४५ च्या सुमारास सांगोला शहरांतर्गत राऊत मळा येथे घडली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राऊत मळा परिसरातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी पिग्मी एजंटला उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

आबासाहेब अशोक राऊत (रा.राऊत मळा, सांगोला) असे जखमी पिग्मी एजंटचे नाव आहे. आबासाहेब राऊत हे विजय नागरी पतसंस्थेत लिपिक पदावर काम करीत असून ते पिग्मीही गोळा करतात.

दरम्यान, सोमवारी पिग्मी गोळा केल्यानंतर रात्री ९:३० च्या सुमारास दुचाकीवरून राऊत घराकडे निघाले होते. त्यावेळी दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी त्यांची दुचाकी अडवली व धारदार शस्त्र दाखवून चिलाराच्या झाडात घेऊन गेले.

त्या ठिकाणी त्यांना मारहाण करीत असताना त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून एक तरुण मदतीला धावून गेला.

मात्र त्यालाही धारदार शस्त्रांचा धाक दाखवल्याने तो तिथून पळून गेला. पोलिसांनी माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयात जाऊन घटनेची चौकशी केली.

Post a Comment

0 Comments