ब्रेकिंग न्यूज..लॉजवर नेलं, बेल्टने मारलं, सोलापुरात मानलेल्या भावाचा विवाहितेवर अत्याचार
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बार्शी-कुर्डूवाडी बायपास रोड येथील एका लॉजवर विवाहित महिलेवर जबरदस्ती करून अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली आहे.
पीडित महिलेवर मानलेल्या भावाने साथीदाराच्या मदतीने अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस गुन्हा दाखल केला आहे.
सुरेश परसू माळी आणि संतोष भास्कर भानवसे असं गुन्हा दाखल झालेल्या दोन संशयित आरोपींची नावं आहेत.
त्यांच्याविरोधात बलात्कार, मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी, असे गंभीर आरोप विवाहित महिलेने केले आहेत. या घटनेचा पुढील तपास बार्शी पोलीस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची पीडित महिलेशी आधीपासून ओळख होती. याचाच गैरफायदा आरोपींनी घेतला.
22 डिसेंबर 2024 रोजी शहरातील एका मंगल कार्यालयात पार पडलेल्या विवाह सोहळा पार पडल्यानंतर आरोपींनी महिलेला "घरी सोडतो" असे सांगून गाडीत बसवले.
गाडी घरी न नेता, आरोपींनी तिला कुर्डूवाडी रोडवरील एका लॉजमध्ये नेलं. लॉजवर पोहोचल्यानंतर महिलेला संशय आल्याने तिने विरोध केला. त्यावर आरोपींनी धमकावत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले.
पीडितेनं विरोध केल्यानंतर आरोपींनी तिला कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. तसेच त्यांनी तिच्या कपड्यांची विटंबना करत किळसवाणं वर्तन केले.
महिलेने मदतीसाठी आरडाओरड केली असता, लॉजचा कर्मचारी आवाज ऐकून घटनास्थळी धावला. त्याने दरवाजा उघडून महिलेची सुटका केली.
या प्रकारानंतर पीडितेला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला.
त्यानंतर आरोपींनी तिला तुळजापूर रोडवर नेऊन पोलिसांत तक्रार दिल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. भीतीपोटी महिलेला तक्रार नोंदवता आली नाही. पण आरोपी पीडितेचा छळ करत राहिले.
अखेर मानसिक आणि शारीरिक त्रास सहन न झाल्याने पीडितेनं 23 मार्च 2025 रोजी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून सुरेश माळी आणि संतोष भानवसे यांच्याविरुद्ध
भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार), 323 (मारहाण), 506 (जिवे मारण्याची धमकी) आणि 34 (सामूहिक कट) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
0 Comments