धक्कादायक ...वहिनी प्रियकरासोबत असतानाच दिराचा घरावर हल्ला; डोक्यात
कुऱ्हाडीने वार, अनैतिक संबंधातून डबल मर्डर मंगळवेढा तालुक्यातील घटना..
अनैतिक संबंधातून दिराने भावजय आणि प्रियकराची हत्या केल्याची घटना मंगळवेढ्यात घडली आहे. मंगळवेढ्यातील गुंजेगावातील ढोबळे वस्तीमध्ये हे दुहेरी हत्याकांड करण्यात आलं आहे.
रिणा दादासाहेब ढोबळे (वय 40) आणि तिचा प्रियकर चंद्रकांत तात्या पाटील हा वस्तीवर मुक्कामी राहायला आला होता.
रिणा ढोबळे आणि चंद्रकांत तात्या पाटील एकाच ठिकाणी वस्तीला असल्याचं रिणाचा दीर लक्ष्मण ढोबळे याला कळालं, तेव्हा त्याने वस्तीवरील नातेवाईकांना गोळा केलं आणि रिणाच्या घरावर कुऱ्हाडीने हल्ला चढवला.
या हल्ल्यात दोघांच्या डोक्यावर वर्मी घाव बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. रिणा ढोबळे ही मंगळवेढा तालुक्यातील
गुंजेगावातील ढोबळे वस्तीची रहिवासी होती. तर चंद्रकांत पाटील हा सांगोला तालुक्यातील राजापूरचा रहिवासी होता.
रिणा ढोबळेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते, त्यानंतर रिणाच्या आयुष्यात चंद्रकांत पाटील आला होता.
चंद्रकांत पाटील आणि रिणा वस्तीवर असल्याचं समजल्यानंतर दीर लक्ष्मण ढोबळे याचा राग अनावर झाला.
यानंतर रिणाच्याच घरच्या लोकांनी तिला आणि तिच्या प्रियकराला संपवून अनैतिक संबंधांचा रक्तरंजित शेवट केला. या दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पंचनाम्याचे काम सुरू आहे.
0 Comments