google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज...सांगोला नगरपरिषदेची थकीत गाळा भाडेकरूचे गाळे सील करून धडक कारवाई

Breaking News

ब्रेकिंग न्यूज...सांगोला नगरपरिषदेची थकीत गाळा भाडेकरूचे गाळे सील करून धडक कारवाई

ब्रेकिंग न्यूज...सांगोला नगरपरिषदेची थकीत गाळा भाडेकरूचे गाळे सील करून धडक कारवाई


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला नगरपरिषदकडून वर्षानुवर्षे थकीत असलेल्या गाळा भाडेकरूवर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. सदर गाळा भाडेकरूंना वारंवार सांगूनसुद्धा त्यांनी थकीत रक्कम नगरपरिषद कार्यालयात जमा केलेली 

नसल्यामुळे त्यांना 7 दिवसाची नोटीस, 3 दिवसाची नोटीस व 24 तासांची अंतिम नोटीस बजावून देखील ज्यांनी रक्कम भरली नाही त्यांचे गाळे आज खालीलप्रमाणे सील करण्यात आले.

1. श्री. संग्राम नागनाथ सक्रे, भाजी मंडई लगत

2. श्री. नौशाद पापा मुलाणी, त्रिमूर्ती टाकी समोर

3. श्री. मयूर राजेंद्र डोंगरे

4. श्री. जमील हसन शेख

5. श्री. विजय वसंत सुपेकर

सदर कार्यवाही नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांचे मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी श्री सचिन पाडे, कर निरीक्षक श्री रोहित गाडे यांचे नेतृत्वात लिपिक श्री. सागर पवार, श्री. आनंद हुलजंतीकर, श्री. रामा सागर, श्री. निकोप ठोकळे, श्री. रमेश मोरे यांनी केली.

तसेच कर व प्रशासकीय अधिकारी श्री. महेश रजपूत व अस्मिता निकम आणि पाणीपुरवठा अभियंता श्री. करण सरोदे यांचे नेतृत्वात पाणीपट्टी थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट करण्याची कार्यवाही सुरू आहे.

वरीलप्रमाणे कटू कार्यवाही टाळायची असेल तर सांगोला शहरातील सर्व मालमत्ता धारकांनी आपल्या थकीत रकमेचा भरणा नगरपरिषद कार्यालयात करून नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ सुधीर गवळी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments