आनंदाची बातमी.. आलदर हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन.
रुग्णांनी व गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.डॉ. महावीर आलदर
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहरातील नामवंत एमडी बालरोग तज्ञ डॉ. महावीर आलदर व आलदर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २९ मार्च २०२५ रोजी
जि.प.प्राथ.शाळा आलदरवाडी (उदनवाडी) ता. सांगोला येथे दुपारी ९ ते ११ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये जन्मलेल्या बाळापासून वयाच्या १८ वर्षापर्यंत रुग्ण मोफत तपासले जातील व त्याचबरोबर रुग्णांना मोफत औषधे देखील दिली जातील.
सदर रुग्णांना ऍडमिट करण्याची गरज असल्यास आलदर हॉस्पिटल, एरंडे कॉम्प्लेक्स सांगोला येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार केले जातील. तरी सांगोला तालुक्यातील सर्व रुग्णांनी व गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.
सर्व रुग्णांनी मंगळवार दि.२८ जानेवारी रोजी आपले सर्व जुने रिपोर्ट व फाईल्स् घेवुन जि.प.प्राथ.शाळा आलदरवाडी (उदनवाडी) येथे यावे व मोफत शिबिराचा लाभ घ्यावा
तसेच अधिक माहितीसाठी ९०२९०४४००९ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन डॉ. महावीर आलदर यांनी केले आहे.
0 Comments