धक्कादायक घटना! भरधाव पिकअपच्या धडकेने अडीच वर्षीय बालक ठार;
अपघातानंतर पळून गेलेला चालक मंगळवेढ्यात हजर
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
भरधाव पिकअपने रस्ता ओलांडणाऱ्या अडीच वर्षीय बालकास जोराची धडक दिल्याने अपघातात बालकाचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.
ही घटना सोमवार, दि.२४ मार्च रोजी रात्री ९:४५ च्या सुमारास वाढेगाव येथील वायदंडे वस्ती येथे घडली.
सिद्धार्थ चेतन वायदंडे असे मृत बालकाचे नाव आहे. याबाबत विठ्ठल लक्ष्मण वायदंडे (रा. वाढेगाव, वायदंडे वस्ती, ता. सांगोला) यांनी पिकअप चालक समाधान चव्हाण (रा. पाटखळ, ता. मंगळवेढा) याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
विठ्ठल वायदंडे यांच्या घरासमोर राजापूर पाटी ते जुना मेडशिंगी जाणारा रोड असून रोडच्या पलीकडे चुलते रमेश वायदंडे हे त्यांच्या कुटुंबासह राहत आहेत.
दरम्यान सोमवार, दि.२४ रोजी रात्री ९:४५ च्या सुमारास चेतन रमेश वायदंडे त्याचा मुलगा सिद्धार्थ वायदंडे याच्यासोबत चुलता संजय दगडू वायंदडे याच्या घराकडे येऊन
परत ते दोघे घराकडे परत जात असताना राजापूर पाटीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या एम.एच. १३ डी.क्यू. ३९४७ या पिकअप जीपने सिद्धार्थ यास जोराची धडक दिली.
पिकअप न थांबता मेडशिंगी गावाकडे भरधाव वेगाने निघून गेला. अपघातानंतर नातेवाइकांनी जखमी सिद्धार्थ वायदंडे यास सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.
अपघातानंतर दत्तात्रय वायदंडे, हणमंत कांबळे, राजू वायदंडे, विक्रम वायदंडे यांनी पळून गेलेल्या पिकअप जीपचा पाठलाग केला असता पिकअप चालक स्वतःहून मंगळवेढा पोलिस ठाण्यात हजर झाला होता.
0 Comments