google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राजकारणापलीकडचे आमदार बाबासाहेब देशमुख राज्याला पहावयास मिळाले: भाई चंद्रकांत देशमुख

Breaking News

राजकारणापलीकडचे आमदार बाबासाहेब देशमुख राज्याला पहावयास मिळाले: भाई चंद्रकांत देशमुख

राजकारणापलीकडचे आमदार बाबासाहेब देशमुख राज्याला पहावयास मिळाले: भाई चंद्रकांत देशमुख


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

स्व. आबासाहेबांनी अकरा वेळा सांगोला विधानसभेचे नेतृत्व केले. परंतु एकदा निवडणुक झाली की, संपुर्ण मतदारसंघातील नागरिकांचे आपण आमदार आहोत. पक्ष, संघटना, जात-पात , पंथ-धर्म, गट्-तट असा भेदभाव न करता 

राजकारणाच्या माध्यमातुन समाजसेवा करण्याची पध्दत आबासाहेबांची होती. आमदार म्हणुन निवडुन आल्यानंतर मन भिन्नता न बाळगता समाजकार्य केले व सर्वाशी जनसंपर्क ठेवत सर्वांना समान न्याय ते देत आसत. 

आज संपुर्ण राज्याला लोकप्रिय आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे मोठेपण पहावयास मिळाले आहे. आबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणाच्या माध्यमातुन समाजकार्य पुढे घेऊन जाताना दिसत आहेत.

आमदार बाबासाहेब देशमुख हे सुध्दा आमदार म्हणुन जरी विशिष्ठ एका पक्षातुन निवडुन आले असले तरी, आपण संपुर्ण मतदार संघातील नागरिकांचे आमदार आहोत.

 जनसेवा करण्यासाठी लोकांनी आपल्यावर विश्वास टाकलेला आहे, असेच वर्तन आमदार बाबासाहेब देशमुख ठेवताना दिसत आहेत. आमदार बाबासाहेब देशमुख सुध्दा जात-पात पंथ धर्म गट-तट आसा भेदभाव न करता

 सर्व जनतेशी सुसंवाद ठेऊन आबासाहेबांप्रमाणे काम करताना दिसत आहेत. आज तर आमदार बाबासाहेबांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी करणे गरजेचे कसे आहे हे संपुर्ण राज्याला दाखवुन दिले आहे.

मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात बोलताना बाबासाहेब म्हणाले की माजी विधानसभा सदस्य मा. शहाजीबापू पाटील यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत त्यांच्या साठी 

असलेली आकाशवाणी -आमदार निवासातील ३१२ क्रमांकाची खोली आणखीन तीन महिने त्यांच्या साठी ठेवण्याच्या मागणीला बाबासाहेबांनी सुध्दा सभागृहातच सहमती दर्शवित

 राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुध्दा काही गोष्टी करायच्या असतात हे संपुर्ण राज्याला दाखवुन देऊन सांगोल्याचे नाव उज्वल केले.

 खरच आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख हे आबासाहेबांचे खरे वारसदार शोभतात त्यांची ही राजकारणापलीकडील कृती संपुर्ण राज्याला पहावयास मिळाली असल्याची भाई चंद्रकांत देशमुख यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments