मोठी बातमी.. रेशन कार्ड धारकांनी ई केवायसी प्रक्रिया 31 मार्च अखेर पर्यंत पूर्ण करून घ्यावी :
पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रांजली गावंडे
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला प्रतिनिधी ः प्रत्येक शिधापत्रिका धारकाला आता ई केवायसी करणे बंधनकारक झाले आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई केवायसी प्रक्रिया
31 मार्च 2025 पर्यंत रेशन कार्ड धारकांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावे असे आवहान पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रांजली गावंडे यांनी केले आहे.
शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांनी आपल्या गावातील स्वस्त धान्य दुकानात तिथे उपलब्ध करून दिलेल्या
ई पॉस डिजीटल यंत्रामध्ये आधार क्रमांक सेटिंग करून घ्यायचा आहे अवघ्या काही सेकंदाची ही प्रक्रिया असून ही केवायसी पूर्ण झाल्यावरच लाभार्थ्यांना धान्य पुरवठा वितरण केला जाणार आहे.
स्थलांतरित कुटुंब हे ज्या ठिकाणी वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन एक केवायसी
पडताळणी पूर्ण करावी रेशन कार्ड साठी ई केवायसी शासनाने मागील सहा महिन्यांपासून सुरू केली आहे मध्यंतरी इंटरनेट सेवा बंद होणे व इतर तांत्रिक कामामुळे ही मोहीम मागे पडली होती.
यामुळे शासनाच्या वतीने वारंवार मुदतवाढ देण्यात आली या आठवड्यात कार्डधारकांनी ई केवायसी पूर्ण करून घ्यावी. नागरिकांनी जवळच्या रेशन दुकानात जाऊन तात्काळ ई केवायसी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वस्त धान्य दुकानात ई केवायसी प्रक्रिया निशुल्क आहे स्वस्त धान्य दुकानातील पाॉस मशीनद्वारे प्रत्येक शिधापत्रकधारकांनी कुटुंबातील सदस्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
सांगोला तालुक्यातील 70 टक्के रेशन कार्ड धारकांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असून राहिलेल्या 30 टक्के लोकांनी 31 मार्च अखेर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी...
संतोष कणसे तहसीलदार सांगोला
0 Comments