google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक..दोस्तीत कुस्ती! मंगळवेढ्यात पैशाच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; अवघ्या 12 तासात आरोपी अटकेत

Breaking News

धक्कादायक..दोस्तीत कुस्ती! मंगळवेढ्यात पैशाच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; अवघ्या 12 तासात आरोपी अटकेत

धक्कादायक..दोस्तीत कुस्ती! मंगळवेढ्यात पैशाच्या


वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; अवघ्या 12 तासात आरोपी अटकेत 

मंगळवेढा :- कधी कधी टिंगल टवाळी किंवा किरकोळ वादातूनही हत्येसारखे गंभीर गुन्हे घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर, दोस्तीत कुस्ती होऊन मित्रा-मित्रांची पैशाच्या कारणावरून भांडणेही एकमेकांच्या जीवावर उठल्याचं पाहायला मिळत आहे.

मंगळवेढा तालुक्यातही अशीच एक धक्कादायक घटना घडली असून मित्रानेच मित्राचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीला अवघ्या 12 तासात अटक केली आहे.

हत्याप्रकरणानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला होता. पोलीस शोध घेऊन अटक केली. मात्र, पैशाच्या वादातून हत्येसारखा गंभीर गुन्हा घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

महेश उदयकुमार गोवर्धन असे मयत झालेल्या तरुणाचे नाव असून आरोपी भिमराव उर्फ बाळू कृष्णा चौगुले (रा.बोराळे ता.मंगळवेढा) यास पोलिसांनी अटळ केली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,  यातील आरोपी भिमराव उर्फ बाळू कृष्णा चौगुले याने मध्यस्थी राहुन यातील मयत महेश उदयकुमार गोवर्धन यास बटईने 

घेतलेल्या तामदर्डी येथील शेतीसाठी लागणारे ठिबक सिंचनचे साहित्य घेवुन दिले होते. त्याचे पैसे यातील मयत महेश गोवर्धन याचेकडुन येणेबाकी होते.

यातील आरोपीत हा त्या पैशाची फोनवरुन मागणी करत होता. त्यावेळी त्यांचेत फोनवर वादावादी झाली होती. त्याचा राग मनात धरुन यातील आरोपी भिमराव उर्फ बाळू चौगुले याने दि.23 मार्च रोजी 9.30 च्या सुमारास बोराळे

 ता. मंगळवेढा येथील छत्रपती चौक येथे मयत महेश गोवर्धन याचे छातीत चाकु सारख्या हत्याराने वार करुन, त्यास गंभीर दुखापत करुन जीवे ठार मारले आहे.

यातील आरोपीत हा गुन्हा घडलेपासुन फरार होता. त्याचा गोपनीय बातमीदारांमार्फत शोध घेवुन त्यास मंगळवेढा पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक  दत्ताञय बोरीगिड्डे, सपोनि विनोद लातुरकर, सपोनि अंकुश वाघमोडे, पोसई विजय पिसे

पोहेकॉ 909 खंडागळे, पोहेकॉ 1810 वाघमोडे, पोहेकॉ 1621 पवार, पोहेकॉ 1603 कांबळे, पोहेकॉ 755 गेजगे, पोना 202 दुधाळ, पोकॉ 1218 देशमुख यांनी 12 तासाचे आत ताब्यात घेतले आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि अंकुश वाघमोडे हे करत आहेत

कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार सदरची कारवाई मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. सुनिल फुलारी सो, मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी सो, सोलापूर ग्रामीण, 

मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. प्रितम यावलकर सो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विक्रांत गायकवाड सो, मंगळवेढा उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली,

मंगळवेढा पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक श्री. दत्ताञय बोरीगिड्डे, सपोनि विनोद लातुरकर, सपोनि श्री. अंकुश वाघमोडे, पोसई श्री. विजय पिसे, पोहेका 909 खंडागळे, पोहेकॉ 1810 वाघमोडे, पोहेकॉ 1621 पवार, पोहेकॉ 1603 कांबळे, पोहेकॉ 755 गेजगे, पोना 202 दुधाळ, पोकों 1218 देशमुख यांचे पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments