google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज भरण्यास 15 मार्च पर्यंत मुदतवाढ समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे

Breaking News

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज भरण्यास 15 मार्च पर्यंत मुदतवाढ समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज भरण्यास 15 मार्च पर्यंत मुदतवाढ समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सोलापूर,  : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. 

या योजनेसाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज सादर करावयाचे असून अर्ज भरण्याकरिता दि. 15 मार्च 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. 

सदर योजनेची व्याप्ती  तालुकास्तरापर्यंत वाढविण्यात आलेली असून विद्यार्थ्यांचे उशिरा सुरु होणारे शैक्षणिक सत्र व विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी आदी कारणामुळे विविध विद्यार्थी संघटना, पालक, विद्यार्थी यांचेकडून

 स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली आहे. याबाबत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक  नुकसान होऊ नये यासाठी पोर्टल वर अर्ज भरण्यासाठी दि. 15 मार्च 2025 पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे.

तसेच यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी बँक तपशिल भरण्याबाबतचा टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज सादर करावेत

 व यापूवी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी सदर पोर्टल वरती लॉग इन करून आपला बँक तपशिल भरावा असे आवाहन समाज कल्याण  सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments