खळबळजनक..सांगोला तालुक्यातील नेतेमंडळींचा मंत्र्यांच्या भेटीचा धडाका सूरु
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदललेली आपण सर्वानी पहिलीच आहेत. अनेक पक्षप्रवेश देखील झाले.
विधानसभा निवडणुकीत डॉ. बाबासाहेब देशमुख याना मताधिक्क्य मिळाले.
शहाजीबापू पाटील आणि दिपकआबा साळुंखे पाटील याना पराभव स्वीकारावा लागला. सांगोला तालुक्यातील विद्यमान आमदारांसह दोन्हीही माजी आमदारांकडून मंत्र्यांच्या भेटीगाठीचा धडाका सुरू आहे.
नवनिर्वाचित आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नव्या मंत्रिमंडळातील जवळपास सर्वच मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आहेत. तर दुसरीकडे दोन्ही पाटील यांनीही मंत्र्यांच्या भेटीचा सपाटा लावला आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन महिने झाले. माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी तर निकालाच्या अर्ध्या तासातच मी पराभवाने खचून जाणारा कार्यकर्ता नाही पद येतात जातात
आतापासूनच मी तालुक्याच्या सेवेत सक्रिय होत असल्याची घोषणा केली. माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी चिंतन बैठक घेऊन आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला होता.
जय पराजयाचा धुरळा खाली बसताच तीनही नेत्यांनी आपली दिशा स्पष्ट केली. नवनिर्वाचित आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सीपी राधाकृष्णन, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर , विकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, विधानपरिषदेचे सभापती
राम शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, विकास मंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अशा दिग्गज नेत्यांच्या भेटी घेतल्या.
शहाजीबापू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस,
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील नेत्यांच्या भेटी घेतल्या.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना मुंबईत बोलावून त्यांचा सत्कार केला होता. यावेळी आमदार बाबासाहेब देशमुख हे महायुतीला पाठिंबा देतील
असा कळस बांधला जात होता. मात्र आमदार देशमुख यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात शेतकरी कामगार पक्ष हा तटस्थ राहील असे स्पष्ट केल्याने या चर्चेवर पडदा पडला.
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मागील आठ दिवसात तब्बल दोन वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने बापूंच्या राजकीय पुनर्वसनाच्या चर्चेने जोर धरला आहे.
मुंबई दौरा वाढल्यानं त्यांची विधानपरिषदकडे आगेकूच सुरु असल्याचे दिसून येते. माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या आगामी
राजकीय भूमिकेबाबत अनेक चर्चाना उधाण आले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नुकतीच भेट घेतल्याने ते भाजपमध्ये जातील की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे
. मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. एकूणच सांगोला तालुक्यातील नेतेमंडळींचा मंत्र्यांच्या भेटीचा धडाका सूरु असल्याचे चित्र दिसतच आहे.
0 Comments