google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील उर्दू शाळेची ही जागेतील नियोजीत बांधकाम स्थगित व रद्द करावे मुस्लिम समाजाच्या वतीने सांगोला नगरपरिषदेसमारे लाक्षणिक बेमुदत उपोषण

Breaking News

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील उर्दू शाळेची ही जागेतील नियोजीत बांधकाम स्थगित व रद्द करावे मुस्लिम समाजाच्या वतीने सांगोला नगरपरिषदेसमारे लाक्षणिक बेमुदत उपोषण

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील उर्दू शाळेची ही जागेतील नियोजीत बांधकाम स्थगित


व रद्द करावे मुस्लिम समाजाच्या वतीने सांगोला नगरपरिषदेसमारे लाक्षणिक बेमुदत उपोषण

सांगोला नगरपरिषदेचे कामकाज प्रशासनाच्या अंतर्गत आल्यापासून सांगोला शहरातील सि.स.नं. १७२९ या जागेतील झालेले सर्व ठराव रद्द करणेकामी नगरपरिषदेसमारे लाक्षणिक बेमुदत उपोषण 

शासकीय वेळेत दि. ०५/०२/२०२५ पासून करीत असलेबाबत आम्ही सर्व मुस्लिम समाज बांधव निवेदन करतो की, सि.स.नं. १७२९ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील उर्दू शाळेची ही जागा असताना

 सांगोला नगरपरिषमध्ये लोकप्रतिनिर्धीचे कार्यकाळ संपल्यानंतर सांगोला नगरपरिषदेचे सर्व ताबा प्रशासनाचा हाती गेल्यानंतर या प्रशासनाकडून 

सांगोला शहरातील कोणत्याही लोकप्रतिनिधींना विचारात न घेता आपल्या मनमर्जीप्रमाणे व चुकीचे काही निर्णय व ठराव घेतलेले आहेत.

सि.स.नं. १७२९ ही जागा पूर्वीपासनू कायमस्वरूपी मुस्लिम समाजाची उर्दू शाळा आहे व त्याचे अवशेष आजही कायम आहेत. सदर जागेपासून मुस्लिम समाजाची जामा मस्जिद फक्त २५ ते ३० फूटावर आहे. सदर मस्जिदीमध्ये पाच वेळीची नमाज पठण होत आहे. व शुक्रवारी मोठ्या संख्येने लोक नमाजकरीता येतात. आपण खुद्द हजर राहून शुक्रवारी पाहणी करू शकता. तसेच वर्षामध्ये रमजानचा महिना पवित्र कुराआनाचे पठण मुखोग्द केले जाते. तसेच श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूड स्मारक व जामा मस्जिद या दोघांच्या मध्यभागी हि उर्दू शाळेची जागा असून या जागेवरती नगरपरिषदेकडून चुकीचे नियोजित बांधकाम झाले तर हे बांधकाम सर्वांनाच अडचणीचे ठरू शकते.अशा परिस्थितीमध्ये जर काही समाजकंठकाकडून काही गैरकृत्य झाले तर समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आपण भविष्यात होणाऱ्या जातीय तेढीचा विचार करून नियोजीत बांधकाम स्थगित व रद्द करावे 

व पुढील अनर्थ टाळावा व सदर समाजासाठी इतरत्र पर्यायी जागेची व्यवस्था करून देण्यात यावे. नगरपरिषदेने दुसरीकडील जागा सुचवावी व त्याचे बांधकाम पूर्ण करण्यास आमची काहीही हरकत नाही.

सदर जागेबाबत अनेक तक्रारी अर्ज सांगोला नगरपरिषदेला दिलेले असताना देखील हे उर्दू शाळेचे बांधकाम जाणून बुझून 

बेकायदेशीरीत्या जेसीबीच्या साहाय्याने ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली. व आपल्या मनप्रमाणेच येथील समाज बांधवांच्या वारंवार भावना दुखावण्याच्या काम करण्यात आलेले आहे.

 एका समाजाचे असलेले बांधकाम जमिनदोस्त करून दुसऱ्या समाजाला ही जमीन देण्याच्या हेतूने दोन समाजामध्ये कटूता निर्माण होईल या सारखे निर्णय व ठराव या सांगोला नगरपरिषदेकडून प्रशासनाच्या हाती कारभार आल्यापासून झालेले आहेत. 

तरी सि.स.नं. १७२९ साठी सांगोला नगरपरिषदेवर प्रशासनाचा कार्यकाळ सुरू झाल्यापासून झालेले सर्व ठराव रद्द करण्यात यावे. यासाठी समस्त मुस्लिम समाज बांधव 

सांगोला नगरपरिषदेसमोर बेमुदत लाक्षणिक उपोषण शासकीय वेळेत दि. ०५/०२/२०२५ पासून करणार आहेत. याची सर्वस्वी जबाबदारी ही सांगोला नगरपरिषदेची राहील याची नोंद घेण्यात यावी हि नम्र विनंती.

Post a Comment

0 Comments