सांगोला शहरात घाणीचे साम्राज्य वाढले आरोग्य निरीक्षक जागेवर नाहीत; परतालुक्यात राहत असल्याच्या तक्रारी..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला/प्रतिनिधी- सांगोला नगरपालिकेच्या आरोग्य विभाग शहरात निष्क्रिय ठरला आहे. आरोग्य निरीक्षक आठवड्यातून एक-दोन दिवस येतात. ते परतालुक्यात राहतात.
शहरात घाणीचे साम्राज्य वाढले आहे. हम करे सो कायद्याप्रमाणे आरोग्य विभागाचे कामकाज सुरू आहे. या विभागाला कोणीच वाली नाही. या विभागावर कोणाचाच वचक नसल्याने प्रचंड भ्रष्टाचार व मनमानी कारभार सुरू आहे.
सांगोला शहरात आरोग्य विभागात कोण अधिकारी व कोण कामगार आहेत हे नागरिकांनाच कळेना. नाकापेक्षा मोती जड या उक्तीप्रमाणे सर्वजणच आपापल्याला अधिकारी असल्याचे समजत आहेत.
आरोग्य विभागात प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. शहरात आरोग्य विभागात ठेकेदारी पद्धतीने काम करणारे कामगार आहेत जेवढे उपस्थिती रजिस्टरला नोंदी आहेत, तेवढे कामगार काम करीत नाहीत.
नागरपालिकेत हजेरीपत्रकाला शंभरच्यावर कामगाराच्या नोंदी आहेत. प्रत्यक्षात निम्मेही कामगार काम करीत नाहीत. परंतु सर्वच गैरहजर कामगारांचाही पगार काढला जातो. नगरपालिकेच्या आरोग्य विभागात निकृष्ट दर्जाची औषधे वापरली जातात.
त्यामुळे डास मारण्याऐवजी डासांचे प्रमाणही वाढत आहे. ठेकेदार टक्केवारी देऊन ठेका घेतो तो कधीच सांगोल्याला येत नाही. अक्षय गायकवाड नावाचा व्यवस्थापक आहे. तो फोनवरून नागरिकांना त्याच्या रुबाबात बोलत असतो.
आरोग्य निरीक्षक तर कधीच शहरात फिरकत नाहीत. कार्यालयीन वेळेत थांबत नाहीत. हजेरीपत्रके बनावट केली आहेत. त्यामुळे ठेकेदार कामगारांची चौकशी करून ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शहरवासी यातून होत आहे.
0 Comments