google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने पोलिस भरती झालेल्या तरुणांचा सत्कार संपन्न

Breaking News

कोळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने पोलिस भरती झालेल्या तरुणांचा सत्कार संपन्न

कोळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने पोलिस भरती झालेल्या तरुणांचा सत्कार संपन्न


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

कोळा ता. सांगोला येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे रमेश सरगर व कुंडलिक सरगर या दोन युवकांची पोलिस भरती मध्ये निवड

 झाल्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने मा.जि.प. सदस्य ड. सचिन देशमुख व कोळा गावचे मा. सरपंच शहाजी हातेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.  

यावेळी भूषण देशमुख, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तुषार माने, अझरूद्दीन खाटिक, नंदू मोरे, विकास काटे, धनंजय काटे, महीपत कुंभार, सौरभ मोरे, ऋतिक काटे, भूषण मोरे, रियाज तांबोळी,

 कशिलिंग सरगर, संकेत सरगर, सागर सोनवणे, आदेश मोहिते, सुनील आलदर, रमेश गोरड, चंद्रकांत आलदर, अतुल आलदर, राहुल लोहार, अनिकेत गुदगे, आनंदा खरात, सुप्रिया कोळेकर आदी उपस्थित होते. 

यावेळी मा.जि.प. सदस्य ड. सचिन देशमुख यांनी सांगितले की, आज आम्हाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे ग्रंथालय सुरु करण्याचा उद्देश साध्य होताना दिसत आहे. 

या ग्रंथालयातून अभ्यास करून मोठ मोठे अधिकारी घडावेत हि अपेक्षा असून या पुढील काळात या ग्रंथालयात अभ्यास करणार्‍या युवकांना सर्वोतपरी मदत करण्याचे आश्‍वासन देवून 

पोलिस भरती झालेल्या युवकांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिस दलात भरती झालेले युवक रमेश सरगर यांनी आपल्या मनोगतामधून सांगितले कि, मी आज पर्यंत 8 वेळा पोलिस भरतीमध्ये उतरलो होतो 

परंतु जिद्द व चिकाटीच्या जोरावर आठव्या वेळेला मला यश मिळाले आहे. सुरुवातीला मी नागज या ठिकाणी वाचनालयात अभ्यासासाठी जात होतो 

त्यामुळे माझा येण्या जाण्यात वेळ जात होता परंतु कोळे या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे ग्रंथालय सुरु झाल्यापासून मी या ठिकाणी अभ्यासासाठी येण्यास सुरुवात केली आणि आज त्याचे फळ मला मिळाले आहे. 

जीवनात अपयश अनेक वेळा येते मात्र खचून न जाता सातत्याने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते. तसेच कुंडलिक सरगर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना आणि  सूत्रसंचालन सागर सोनवणे यांनी केले.

Post a Comment

0 Comments