श्री अंबिकादेवी यात्रेनिमित्त बुधवार दि. ५ फेब्रुवारी रोजी जंगी कुस्त्यांचे मैदान
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : तालुका प्रतिनिधी सांगोला शहर आणि तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री अंबिकादेवी यात्रा निमित्त बुधवार दि. ५ फेब्रुवारी रोजी जंगी कुस्ती
मैदानाचे आयोजन केले असल्याची माहिती कोर्ट रिसिवर सांगोला यांनी दिली.
बुधवार दि ५ रोजी दु ४.०० पासून या जंगी कुस्त्यांचा आखाडा रंगणार आहे. या कुस्ती मैदानासाठी संपूर्ण राज्यभरातून आणि सोलापूर जिल्ह्यातून नामांकित मल्ल सहभागी होणार आहेत.
तरी, सांगोला शहर आणि तालुक्यातील कुस्ती शौकिनांनी कुस्त्यांची दंगल अनुभवण्यासाठी क्रीडा संकुल मैदान
सांगोला येथे उपस्थित राहावे असे आवाहन श्री अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समिती तथा कोर्ट रिसिव्हर सांगोला यांनी केले.
0 Comments