google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..शहाजीबापू पाटील यांच्या आमदार निधीतून बांधलेल्या पाचेगाव बु।। येथे सभा मंडपाचे शानदार उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न

Breaking News

मोठी बातमी..शहाजीबापू पाटील यांच्या आमदार निधीतून बांधलेल्या पाचेगाव बु।। येथे सभा मंडपाचे शानदार उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न

मोठी बातमी..शहाजीबापू पाटील यांच्या आमदार निधीतून बांधलेल्या पाचेगाव बु।।


येथे सभा मंडपाचे शानदार उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- सध्या अनेक भागात विकासकामांचा धडाका सुरु आहे. नागरिकांच्या अनेक मागण्या पूर्ण केल्या जात आहेत. सांगोला तालुक्यात देखील सध्या अनेक विकासकामे सुरु आहेत. 

सांगोला तालुक्यातील पाचेगाव बु।। येथे माजी आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांच्या आमदार निधीतून दहा लाख रुपये खर्चून बांधलेल्या महादेव मंदिरासमोरील सभामंडपाचे शानदार उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

सांगोला नगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रा. संजय देशमुख, बांधकाम समितीचे माजी सभापती सतीशभाऊ सावंत, किडेबिसरीचे सरपंच व नेते शिवाजीराव घेरडे, शिवसेनेचे नेते तुषार इंगळे,

 राष्ट्रवादीचे युवक नेते ज्ञानेश्वर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाशिवरात्रीचे औचित्य साधून महादेवाच्या मंदिरासमोरील सभामंडपाचा उद्घाटन समारंभ व लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

यावेळी महादेव घोडके, नंदकुमार घोडके, बाळासाहेब घोडके, पंढरीनाथ घोडके, संतोष घोडके, राजाराम घोडके, बबन घोडके, अशोक बिले, समाधान बिले, उल्हास बिले,

 अशोक दौंड, प्रमोद दौंड, माणिक घोडके, विनायक घोडके यांच्यासह नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी उपस्थितांनी माजी आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांनी महादेव मंदिरासमोर सभा मंडप बांधण्यासाठी आमदार निधीतून दहा लाख रुपये निधी देऊन विकासाला गती दिल्याबद्दल आभार मानले.

Post a Comment

0 Comments