धक्कादायक..घरी जाण्यासाठी स्वारगेटला गेली,
नराधमाने डाव साधला, शिवशाहीत तरूणीवर अत्याचार केला
शिवशाही बसमध्ये झालेल्या २६ वर्षीय तरूणीवर बलात्कारामुळे पुणे हादरलं आहे. पुण्याच्या स्वारगेटमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. स्वारगेट बसस्थानक तसे वर्दळीचं ठिकाण. कायम बस आणि प्रवाशांची ये- जा सुरू असते.
पण याच गर्दीच्या ठिकाणी एका गुंडानं तरूणीवर भल्या पहाटे बलात्कार केलाय. या घटनेमुळे महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नेमकं घडलं काय? हे प्रकरण कसं उघडकीस आलं? पाहुयात.
राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आणखी एका घटनेमुळे राज्यात संतापाची लाट उसळली.
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एका तरूणीवर अतिप्रसंग घडला. ही तरूणी आपल्या घरी पुण्याहून फलटणला जात होती. पहाटेला ती स्वारगेट बस डेपोमध्ये पोहोचली.
बसची वाट पाहत असताना, त्या ठिकाणी आरोपी आला. आरोपीचं नाव दत्तात्रय गाडे आहे. दत्ता गाडे हा सराईत गुन्हागार असल्याची माहिती आहे. त्याच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहे.
दत्ता गाडेनं तरूणीला बस दुसरीकडे उभी असल्याचं सांगितलं. माझी बस इथेच येईल, मी तिकडे जाणार नाही. असं त्या तरूणीनं सांगितलं. एकटी तरूणी असल्याचं पाहताच त्याच्या डोक्यात सैतान घुसला. त्याने तरूणीला खडसावले
आणि कोपऱ्यात उभी असलेल्या शिवशाही बसमध्ये तिला जायला सांगितलं. तु टॉर्च लावून आतमध्ये जा, हीच बस फलटणला जाईल, असं त्या नराधमानं सांगितलं.
तरूणी टॉर्च लावून आत गेली, आणि तिच्या पाठोपाठ नराधम गेला आणि तिच्यावर जबरदस्ती केली. लैंगिक अत्याचार करून आरोपी तेथून पसार झाला.
तरूणीनं त्या ठिकाणी कुणालाच याची माहिती दिली नाही. ती थेट फलटण तिच्या घरी गेली. घरी गेल्यानंतर तिने याची सगळी हकिकत आपल्या आई वडिलांनी सांगितली.
पीडीत मुलीच्या पालकांनी पोलीस ठाणे गाठत तरूणीसोबत झालेली सगळी माहिती त्यांनी दिली. पोलीस तपासात आरोपी दत्ता गाडे याने हे कृत्य केल्याचं समोर आलं.
पुण्यातील शिवशाही अत्याचार प्रकरणावर पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार, तपास वेगाने सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
0 Comments