google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विद्यार्थ्या मध्ये जिद्द व चिकाटी हाच यशाचा मूलमंत्र – तहसिलदार संतोष कणसे

Breaking News

विद्यार्थ्या मध्ये जिद्द व चिकाटी हाच यशाचा मूलमंत्र – तहसिलदार संतोष कणसे

विद्यार्थ्या मध्ये जिद्द व चिकाटी हाच  यशाचा मूलमंत्र – तहसिलदार संतोष कणसे


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी) : आजचे युग स्पर्धेचे आहे. जग दररोज बदलत आहे. माहितीचा विस्फोट झाला

 असून माहिती तंत्रज्ञानाच्या काळात जग जवळ आले असून माहिती सहज उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यानी नवीन तंत्रज्ञानाच उपयोग

 आपल्या अभ्यासासाठी करावा त्याच्या माध्यमातून ज्ञान मिळण्यास मदत होईल. विद्यार्थ्या मध्ये जिद्द व चिकाटी असेल तर तो निश्चित यशस्वी होतो असे प्रतिपादन सांगोल्याचे तहसिलदार मा.संतोष कणसे यांनी केले.

सांगोला महाविद्यालय सांगोला व ग्रामपंचायत मेडशिंगी यांच्या संयुक्त विद्यमाने मेडशिंगी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम संस्कार शिबिरा मध्ये “स्पर्धा परीक्षा व ग्रामीण युवक” 

या विषयावर ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्या मध्ये कष्ट करण्याची, 

संकटाना तोंड देण्याची उपजत शक्ती असते. आपणामध्ये गुणवत्तेची कुठलीही कमतरता नसून आपण दोन तीन वर्ष परिश्रम घेतले तर यश आपलेच आहे असे ते या प्रसंगी म्हणाले.

 त्यांनी आपल्या जीवनातील विविध उदाहरण देवून विद्यार्थ्यांना पटवून दिले कि माझ्यासारख्या व्यक्ती जर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होयू शकतो तर तुम्ही ही परिश्रम केल्यास निश्चित यश मिळवू शकता.

कार्यक्रमच्या अध्यक्षीयमनोगतामामध्ये श्री विजयसिंह इंगवले यांनी विद्यार्थ्याना आवाहन केले की त्यांनी महाविद्यालयीन जीवनात अभ्यास करून आपले भविष्य घडवावे. जी व्यक्ती विद्यार्थी दशेत कष्ट करते 

ती भविष्यात मोठी होत असते असे ही ते या प्रसंगी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ नवनाथ शिंदे यांनी, पाहुण्यांचा परिचय प्रा संतोष लोंढे यांनी तर आभार डॉ सदाशिव देवकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments