आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे उपस्थितीत आढावा बैठक संपन्न
आढावा बैठकीत जलजीवन मिशन योजनेच्या कामांच्या अनेक तक्रारी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला(प्रतिनिधी):- शिरभावी नळ पाणीपुरवठा लाईट बील, पाणीपट्टी तसेच बीला वरील व्याज कमी करणे बाबत सरपंच व ग्रामसेवक तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी यांची स्वतंत्र बैठक घेण्यात घेऊन तोडगा काढण्यात येईल.
त्याचप्रमाणे जलजीवन मिशन कामाच्या अनेक तक्रारी असल्यामुळे जिल्हास्तरीय बैठक घेऊन अडचणी सोडवण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली.
दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी बचत भवन पंचायत समिती सांगोला येथे दुपारी 2 वाजता तालुक्यातील सरपंच ,ग्रामपंचायत अधिकारी ,
पंचायत समिती अधिनस्त विभाग प्रमुख तसेच विस्तार अधिकारी सर्व यांची विविध विकास कामासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
शिरभावी नळपाणी पुरवठा योजना , जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र दुरुस्ती, औषध साठा आरोग्य केंद्रातील सोयी सुविधा, सार्वजनिक शौचालय, शालेय
पोषण आहार, शाळा इमारत बांधकाम निर्लेखन करावयाच्या इमारती , प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, राज्य पुरस्कृत घरकुल योजना रमाई, घरकुल योजना जागा बक्षीस पत्र, जागा अडचणी, घरपट्टी, पाणीपट्टी वसुली,
शाळा अंगणवाडी स्वच्छतागृह ,पिण्याचे पाणी, व संभाव्य पाणी टंचाई , अकांक्षीत तालुका कार्यक्रमाच्या फेलो अनुजा गावडे यांनी या बाबत या विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली व त्यातील अडचणी जाणून घेण्यात आल्या.
यावेळी गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी , सहाय्यक गटविकास अधिकारी वसंत फुले, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर ,उपअभियंता बांधकाम
अतुल लेंडवे, उपअभियंता पाणीपुरवठा सेनापती केदार, बाल विकास प्रकल्प अधिकारी अभिजीत मोलानी, गटशिक्षणाधिकारी अमोल नवले , विस्तार अधिकारी पंचायत देवराव पुकळे, विस्तार
अधिकारी पंचायत अमोल तोडकरी, विस्तार अधिकारी सांख्यिकी पुंडलिक गंगंदे, विस्तार अधिकारी आरोग्य मिलिंद सावंत , विस्तार अधिकारी शिक्षण अमोल भंडारी, उपस्थित होते यानंतर गटविकास अधिकारी कुलकर्णी
यांचे मार्गदर्शनाखाली 2025-20 26 जीपीडीपी आराखडा वेळेत पूर्ण केले बद्दल ग्रामपंचायत सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचे अभिनंदन देवराव पुकळे यांनी केले. यानंतर मिलिंद सावंत यांनी आभार मानले.
0 Comments