मोठी बातमी..उपमुख्यमंत्री शिंदे यांची अॅड. पाटील यांनी घेतली भेट सांगोल्याच्या प्रलंबित विकास कामांवर चर्चा
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:- तालुका प्रतिनिधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे उपनेते माजी आमदार शहाजीबापू पाटील
यांची रविवार, २ जानेवारी रोजी मुंबई येथे भेट संपन्न झाली. या बैठकीत सांगोल्याच्या रखडलेल्या विकास कामांवर चर्चा झाली.
अॅड. शहाजीबापू पाटील यांच्या गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सांगोला तालुक्यातील विकास कामांना काही प्रमाणात ब्रेक लागला होता.
या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे व शहाजीबापू पाटील •यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
शहाजीबापूंनी मंजूर केलेल्या विकास निधीतील अनेक कामे सध्या प्रगतीपथावर असून याच कामांचा आढावा
आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाली.शहाजीबापूंच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा
शहाजीबापू पाटील हे शिवसेनेचे स्टार प्रचारक आणि महत्त्वाचे नेते मानले जातात. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यापासून शिवसेना पक्षाचे
मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाटील यांचे राजकीय पुनर्वसन करतील अशा यांच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि शहाजीबापूंच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा
शहाजीबापूंच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा सांगोला तालुक्यात जोर धरू लागली आहे.सांगोला तालुक्यातील रखडलेले प्रश्न मार्गी लावणे हे माझे कर्तव्य आहे.
मी आमदार असलो किंवा नसलो तरी सांगोला तालुक्यातील जनतेच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत
आणि शेवटच्या श्वासापर्यंत या जनतेची सेवा आपण करीत राहणार असल्याचे अॅड. पाटील यांनी
सांगितले.
0 Comments