google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक!सोलापुरात एका खासगी बँकेतील वसुली कर्मचाऱ्यांनी माणुसकीला काळिमा फासेल, असे कृत्य बँकेचे हफ्त न भरल्याने कर्जदारच्या मुलालाचं उचलून डाबून ठवेले; सोलापुरात 3 वसुलीदारांविरुद्ध गुन्हा

Breaking News

धक्कादायक!सोलापुरात एका खासगी बँकेतील वसुली कर्मचाऱ्यांनी माणुसकीला काळिमा फासेल, असे कृत्य बँकेचे हफ्त न भरल्याने कर्जदारच्या मुलालाचं उचलून डाबून ठवेले; सोलापुरात 3 वसुलीदारांविरुद्ध गुन्हा

धक्कादायक!सोलापुरात एका खासगी बँकेतील वसुली कर्मचाऱ्यांनी माणुसकीला काळिमा फासेल,


असे कृत्य बँकेचे हफ्त न भरल्याने कर्जदारच्या मुलालाचं उचलून डाबून ठवेले; सोलापुरात 3 वसुलीदारांविरुद्ध गुन्हा 

सोलापूर : एकीकडे बीडमध्ये खंडणीचा गुन्हा व अपहरण करुन हत्या केल्याची घटना ताजी असतानाच, या घटनेवरुन राज्यभर संतापाची लाट उसळली असतानाच सोलापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 सोलापुरात एका खासगी बँकेतील वसुली कर्मचाऱ्यांनी माणुसकीला आणि कुठल्याही संस्थेळा काळिमा फासेल असं कृत्य केलंय. केवळ चारचाकी वाहनाचे हफ्त चुकवले 

म्हणून वाहनासह कर्जदाराच्या मुलालही उचलून नेल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी, पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारी 2025 रोज शहरातील जेल रोड पोलीस ठाण्यात एका तरुणाची अपहरण झाल्याची तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी याबाबत तपास केला.

 त्यानुसार, येथील बँक कर्मचार्‍यांनी चक्क चार चाकी वाहनाचे हप्ते भरले नसल्याने कर्जदाराच्या मुलाचे चक्क अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

विशेष म्हणजे चारचाकी वाहनासह कर्जदाराच्या मुलाचेही अपहरण करण्यात आले होते, सोलापुरात या खासगी बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांकडून मोठी मुजोरी करण्यात 

आल्याचं पोलीस तपासातून समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या कर्मचाऱ्यांनी कर्जदाराच्या मुलाचे अपहरण करत त्यास एका गोडाऊनमध्ये डांबून ठेवले होते.

 याप्रकरणी, वसुलीसाठी अपहरण करणाऱ्या शकील बोंडे, इमरान शेख, देवा जाधव या तिघांविरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील अधिक तपास सुरू आहे.

अपहरणानंतर कर्जदारास मागितली खंडणी

वसुली कर्मचाऱ्यांनी कर्जदाराच्या मुलाचे अपहरण केले. मात्र, त्यानंतरही मुलाला सोडण्यासाठी दहा हजार रुपयांची खंडणी मागितल्याचंही पोलिसा तपासातून समोर आलं आहे. 

त्यामुळे, चुकीच्या पद्धतीने जबरदस्तीने वसुली करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणार असल्याचं इशारा पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिला आहे. 

दरम्यान, बँक किंवा फायनान्स कंपनींचे एजंट सक्तीची किंवा गुंडगिरी पद्धतीने वसुली करत असतील तर कर्जदार किंवा नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सोलापूरच्या नागरिकांना विजय कबाडे यांनी केलं आहे.

Post a Comment

0 Comments