google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 श्री.अंबिकादेवी यात्रेनिमित्त शेतीमाल प्रदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन

Breaking News

श्री.अंबिकादेवी यात्रेनिमित्त शेतीमाल प्रदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन

श्री.अंबिकादेवी यात्रेनिमित्त शेतीमाल प्रदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला(प्रतिनिधी):- श्री.अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समिती, सांगोला यांचेवतीने श्री.अंबिकादेवी यात्रा निमित्त आजपासून शेतीमालाचे प्रदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले

 असल्याची माहिती कोर्ट रिसिव्हर्स अंबिकादेवी यात्रा व प्रदर्शन समिती, सांगोला यांचेवतीने देण्यात आली.

आज शनिवार दि.1 फेब्रुवारी रोजी शेळ्या मेंढ्या व सर्वप्रकारचा बाजार भरणार आहे. रविवार दि.2 फेब्रुवारी व सोमवार दि.3 फेब्रुवारी रोजी सर्व प्रकारचा बाजार व विविध स्पर्धा होणार आहेत.

 मंगळवार दि.4 फेब्रुवारी रोजी रथसप्तमी महापूजा, महानैवेद्य व रात्री 9 वा. भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

बुधवार दि.5 फेब्रुवारी रोजी जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. गुरुवार दि.6 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा. शेतीमालाची निवड करण्यात येणार आहे.

 शुक्रवार दि.7 फेब्रुवारी रोजी सायं.5 वाजता बक्षीस समारंभ सायं.7 वाजता शोभेच्या दारूकामाने सांगता करण्यात येणार आहे. 

रविवार दि.2 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता इ.1 ली ते 4 थी गटासाठी रंगभरण स्पर्धा, इ.5 वी ते.7 वी गटासाठी चित्रकला स्पर्धा व इ.8 वी ते 10 वी गटासाठी चित्रकला स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.

सोमवार दि.3 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता इ.5 वी ते 7 वी गटासाठी ठिपक्यांची रांगोळी, इ.8 वी ते इ.10 वी गटासाठी ठिपक्यांची रांगोळी तर खुला गटासाठी संस्कार भारती स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. 

मंगळवार दि.4 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता 17 वर्षेखालील मुलासाठी मिनी मॅरेथॉन, 17 वर्षाखालील मुलीसाठी 3 किमी धावणे

 स्पर्धा तर खुला गट मुले व मुलींसाठी 5 किमी धावणे स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. 7 फेब्रुवारी रोजी सायं.5 वाजता श्री.अंबिकादेवी पालखीची यात्रेतून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

यात्रा कालावधीत श्री दत्त महिला भजनी मंडळ (महादेव गल्ली), यमाई महिला भजनी मंडळ (देशपांडे गल्ली), श्रीराम महिला भजनी मंडळ (महादेव गल्ली), 

श्री विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ (वज्राबाद पेठ), जय तुळजाभवानी महिला भजनी मंडळ (वज्राबाद पेठ), श्री विठ्ठल महिला भजनी मंडळ (कोष्टी गल्ली), 

ब्रह्मचैतन्य महिला भजनी मंडळ (वासूद रोड), स्वामी समर्थ भजनी मंडळ (कुंभार गल्ली), साई महिला भजनी मंडळ (वासूद रोड), बसवेश्वर भजनी मंडळ (मेन रोड), , दत्त भजनी मंडळ (पुजारवाडी),

 चौंडेश्वरी भजनी मंडळ (कोष्टी गल्ली), रुद्र भजनी मंडळ (सांगोला), श्रीराम महिला भजनी मंडळ, एखतपूर आदी भजनी मंडळाचे भजन होणार आहे.

अधिक माहितीसाठी कोर्ट रिसिव्हर सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड.सारंग वांगीकर, अ‍ॅड.विक्रांत बनकर, अ‍ॅड. विशालदीप बाबर, अ‍ॅड.नितीन बाबर, अ‍ॅड.सौ. शशिकला खाडे , अ‍ॅड.महेंद्र पतकी यांचेशी संपर्क साधावा.

यावर्षीपासून खिलार जनावरांची निवड होणार

मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी खिलार जनावरांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी कोसा खिलार व पांढरा खिलार असे दोन गट तयार करण्यात आले

 असून प्रथम क्रमांकासाठी 5 हजार रुपये व द्वितीय क्रमांकासाठी 3 हजार रुपये असे पारितोषिके देण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments