आमदार साहेब , आमच्या समस्या ऐका व विधानसभेत मांडा सांगोला ; अधिवेशन अगोदर आढावा बैठक (आमसभा) घेण्याची नागरिकांची मागणी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी) -महाराष्ट्र सरकारचे २०२५ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन दिनांक ३ मार्च ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे.
त्यामुळे सांगोला तालुक्यातील नागरिकांच्या अनेक समस्या व अडचणी शासन दरबारी गेल्या पाहिजेत.
यासाठी सांगोला विधानसभा मतदारसंघातील समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी सर्वच शासकीय विभागांची आढावा बैठक (आमसभा )
आ. बाबासाहेब देशमुख यांनी लवकरात लवकर आयोजित करावी, अशी मागणी सांगोला तालुक्यातील नागरिकांमधून होत आहे.
तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. काही गावात पाण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला होता. शेतीवर ही पाणी टंचाईचे संकट निर्माण होऊ लागल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.
गेल्या काही वर्षात जी विकास कामे सुरू आहेत व पूर्ण झाली आहेत, त्याचा दर्जा मात्र निकृष्ट असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांमधून येत आहेत.
प्रशासनातील काही अधीकारी व कर्मचारी मनमानी कारभार करत असल्याने नागरिकांना व शेतकरी ,विद्यार्थी , महिला भगिनींना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे.
तरी लोकप्रिय युवा आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आढावा बैठक (आमसभा ) घेण्याची मागणी होत आहे.
0 Comments