धक्कादायक..सांगोला-जत रस्त्यावर कार-दुचाकीची धडक; एक जण ठार
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला - जत रोडवर खारवटवाडी येथे चारचाकी गाडी व मोटरसायकलचा अपघात होऊन मोटरसायकल चालक रघुनाथ बापू भोसले (वय ४४, रा. डोंगरगाव, ता. सांगोला) हे जागीच ठार झाले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सांगोला- जत रोडवर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सांगोला वरून येत असणारी चारचाकी (एम एच ४५ ए यु १७७५) ने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला (एम एच ४५ बी ए २३६२) समोरून धडक दिली.
यात मोटरसायकल चालक रघुनाथ भोसले हे जागीच ठार झाले. अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
0 Comments