google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..नजरचुकीने दरवाजा उघडा राहिला व चोरट्याने मध्यरात्री साथली संधी अज्ञात चोरट्याकडून पावणेआठ तोळे सोन्याचे दागिने लंपास सांगोला तालुक्यातील घटना..

Breaking News

खळबळजनक..नजरचुकीने दरवाजा उघडा राहिला व चोरट्याने मध्यरात्री साथली संधी अज्ञात चोरट्याकडून पावणेआठ तोळे सोन्याचे दागिने लंपास सांगोला तालुक्यातील घटना..

खळबळजनक..नजरचुकीने दरवाजा उघडा राहिला व चोरट्याने मध्यरात्री साथली संधी अज्ञात


चोरट्याकडून पावणेआठ तोळे सोन्याचे दागिने लंपास सांगोला तालुक्यातील घटना..

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील ठेवलेले सोन्याचे गंठण, सोन्याचे नेकलेस, अंगठी व कानातील झुबे असे सुमारे सात तोळे 

आठ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चिकमहूद, बंडगरवाडी (ता. सांगोला) येथे घडली आहे.

अनिल शिवाजी बंडगर (रा. चिकमजूद बंडगरवाडी, ता. सांगोला) हे बरील ठिकाणी आपल्या कुटुंबासह राहतात, अनिल बंडगर यांचे दोन मजली घर असून आई, 

वडील खालच्या मजल्यावरील घरात असतात. तर बंडगर आपल्या पत्नी व मुलासह घराचे दुसऱ्या मजल्यावर झोपी 

• नजरचुकीने दरवाजा उघडा राहिला व चोरट्याने मध्यरात्री साथली संधी

- गेले होते. रविवारी रात्री दहाच्या सुमारास बंडगर - यांच्या घरातील सर्व कुटुंबीय जेवणखाण करून झोपी गेले होते. परंतु झोपी जाताना अनिल बंडगर - यांच्याकडून वरच्या खोलीचा दरवाजा नजरचुकीने उघडा राहिला होता. 

दरम्यान सोमवारी पहाटे - दीडच्या सुमारास अनिल बंडगर यांना झोपेतून - जाग आली. त्यावेळी त्यांना घरात बॅटरीचा उजेड - दिसला म्हणून 

ते वरच्या मजल्यावरील घरातून - जिना उतरून खाली आले असता घरातील सामान - अस्ताव्यस्त दिसून आले. बंडगर हे बेडरुममध्ये - गेले असता बेडरुममधील कपडे व इतर सामान अस्ताव्यस्त पडलेले होते 

तर घराचा दरवाजा उघडा दिसला म्हणून त्यांनी परत बेडरुममध्ये येऊन कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने पाहिले असता ते कपाटात कोठेही दिसून आले नाही. त्यांनी घरात आजूबाजूला दागिन्यांचा शोथ घेतला 

असता ते कुठेही मिळून आले नाहीत. यावरून अनिल बंडगर यांची खात्री झाली की रात्री झोपी जाताना घराच्या हॉलचा दरवाजा अजानतेपणाने घाईगडबडीत उघडा राहिला होता. त्यामुळे चोरट्याने चोरी केली आहे.

 याबाबत अनिल बंडगर यांनी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले सुमारे तीन लाख ९० हजार रुपये किमतीचे सात तोळे व आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याबाबत फिर्याद दाखल केली आहे.

Post a Comment

0 Comments