डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचे शिवाजीराव बनसोडे व तानाजी भोसले यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न!
(मा. आमदार शहाजी बापू पाटील यांनी अभ्यासकेसाठी केले होते १० लाख रुपये मंजूर)
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार माजी आमदार, अँड शहाजी बापू पाटील यांच्या प्रयत्नातून मतदारसंघातील धायटी येथे मागील वर्षी अभ्यासिका मंजूर करण्यात आली होती.
या अभ्यासिकेसाठी आमदार फंडातून शहाजी बापू पाटील यांनी दहा लाख रुपयांचा निधी मिळवून दिला होता
धायटी तालुका सांगोला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेची भूमिपूजन काल धायटी ग्रामपंचायतीचे सदस्य शिवाजीराव बनसोडे व सांगोला तालुका शिवसेना उपप्रमुख तानाजीराव भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
हा निधी वर्ग होऊन काम सुरू झाले असून ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका असून यासाठी मा.आमदार शहाजी बापू पाटील यांनी विशेष प्रयत्न केले होते.
या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी नाना झेंडे संदीप बनसोडे, दत्ता बनसोडे, संदीप बनसोडे, पांडुरंग बनसोडे, विनोद बाबर, कृष्णा भुसे, काशिलिंग बनसोडे, वैभव जाधव यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments