सांगोला तालुक्यात नेतेमंडळींच्या भूमिकेवर अवलंबून असणार सर्व गणिते……
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेची निवडणूक लागण्याची चिन्हे आहेत.
सांगोला तालुक्यात यापूर्वी अनेकवेळा स्वर्गीय माजी आमदार भाई गणपतराव देशमुख, माजी आम. अॅड. शहाजी पाटील व माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हे तिघेही एकत्र येऊन
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवत होते. तोच प्रयोग 2025 मध्ये होतो का? याकडे लक्ष लागले आहे. सर्वच पक्षांची निवडणूक तयारीच्या दृष्टीने खलबते सुरू आहेत. अशा तापलेल्या राजकीय स्थितीत
सांगोला तालुक्यात सत्तेत असलेला शेतकरी कामगार पक्ष हा स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार? की ज्यांच्यासोबत नुकताच निवडणूक सामना केला त्यांच्याशी सलगी करणार हे स्पष्ट होणार आहे.
माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हे काय भूमिका घेतात? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. स्वगृही जातात की भाजपमध्ये जातात? याबाबत सध्या जोरदार चर्चा आहे.
गेले तर युतीतील कोणत्यातरी घटक पक्षातच जातील व माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्याबरोबर युती करून ग्रामीण भागातील मिनी मंत्रालय समजले
जाणाऱ्या पंचायत समितीवर 58 वर्षानंतर पुन्हा सत्ता मिळवण्याच्या तयारीला लागतील, अशी जोरात चर्चा आहे. पंचायत समिती व नगरपालिकेवर सत्ता मिळवायची असेल तर साळुंखे-पाटील यांच्या गटाला महत्त्व आहे.
शेकापला किंवा बापूला या दोघांना साळुंखे-पाटील गटाला बरोबर घेतल्याशिवाय सत्ता मिळवता येणार नाही,
हे विधानसभा निवडणुकी प्रसंगी दिसून आल्याने साळुंखे-पाटील हे जिकडे असतील तिकडे गुलाल दिसून येणार आहे.
त्यादृष्टीने आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आ. शहाजीबापू पाटील, माजी आम. दीपकआबा साळुंखे- पाटील हे नेते कोणती भूमिका घेतात यावर सर्व गणिते अवलंबून आहेत.
0 Comments