संतापजनक! सोलापूर जिल्ह्यात शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य;
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे 9503487812)
विद्यार्थिनी आणि शिक्षक हे खूप पवित्र नातं आहे. शिक्षकांच काम विद्यार्थ्यांना घडवण्याचं आहे. त्यातून एक चांगला समाज घडतो. विद्यार्थीदशेत मुल-मुली आपला जास्तवेळ शाळेत घालवतात. शाळेकडून मिळणारे संस्कार आयुष्यभर सोबत राहतात.
शाळेत बाल मनावर झालेले संस्कार उद्याचा यशस्वी समाज बनतो. पण अलीकडे विद्यार्थी आणि शिक्षकांमधल्या गुरु-शिष्याच्या पवित्र
नात्याला कलंक लागण्याच्या घटना समाजात वाढू लागल्या आहेत. बऱ्याचदा काही शिक्षकांना आपल्या जबाबदारीचा विसर पडत असल्याच दिसत आहे.
आज शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आज शिक्षण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पैसा कमावला जात आहेत.
पण त्याचवेळी काही शिक्षकांना आपल्या सामाजिक जबाबदारीचा विसर पडत असल्याचही दिसून आलय.
सोलापुरातील एका नामांकित शाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध ‘पोस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादवरून सोलापुरातील एका नामांकित शाळेतील शिक्षकाविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. विद्यार्थिनीला शिक्षकाने केलं प्रपोज
यल्लपा उर्फ सुमित गाडेकर असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. ‘मला सोडून जाऊ नकोस, अन्यथा मी काहीतरी बरेवाईट करून घेईन’, अशी धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याचं विद्यार्थिनीने फिर्यादमध्ये म्हटलं आहे.
शिक्षकाने जुलै 2023 मध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी संवाद साधून प्रपोज केलं. विद्यार्थिनीने नकार दिल्यानंतरही हा शिक्षक सतत पाठलाग करत होता.
हात धरून जबरदस्तीने नेलं
जानेवारी 2024 मध्ये हात धरून जबरदस्तीने घेऊन जाऊन तिच्याशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या शिक्षकावर आहे.
पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पॉस्को कलम 12 सह भारतीय न्याय संहिता कलम 74, 78, 351 (2) अन्वये गुन्हा नोंद झाला आहे.
अलीकडे अशा बातम्या येण्याच प्रमाण वाढलं आहे. पालक शिक्षकांवर विश्वास ठेऊन आपल्या मुला-मुलींना शाळेत पाठवतात. पण काही शिक्षक गैरफायदा घेत असल्याच दिसून आलं आहे.
0 Comments