google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलीस ठाणे कडील तपास पथक यांनी संशयित ईसम याचा तांत्रिक पद्धतिने तसेच कसोशिने शोध संशयित ईसम व मिळून आलेले सोने हे आंध्र प्रदेश राज्यातील पोलीस यांचेकडे पुढील तपासकामी ताब्यात

Breaking News

सांगोला पोलीस ठाणे कडील तपास पथक यांनी संशयित ईसम याचा तांत्रिक पद्धतिने तसेच कसोशिने शोध संशयित ईसम व मिळून आलेले सोने हे आंध्र प्रदेश राज्यातील पोलीस यांचेकडे पुढील तपासकामी ताब्यात

सांगोला पोलीस ठाणे कडील तपास पथक यांनी संशयित ईसम याचा तांत्रिक पद्धतिने तसेच कसोशिने


शोध संशयित ईसम व मिळून आलेले सोने हे आंध्र प्रदेश राज्यातील पोलीस यांचेकडे पुढील तपासकामी ताब्यात 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला पोलीस ठाणे हद्‌दीमध्ये २७/०१/२०२५ रोजी आंध्र प्रदेश राज्यातील धर्मावरम फस्ट टाउन पोलीस ठाणे कडील

 पोहवा / २४२६ नागांजलेलु व पोलीस पथक असे सांगोला पोलीस ठाणे येथे येवुन धर्मावरम पोलीस ठाणे गु.र.नं.१७/२०२५ बी.एन.एस. २०२३ चे कलम ३१८(४),३१६(४) प्रमाणे दाखल

 गुन्हयातील पाहिजे व संशयित आरोपीत याचा शोध घेणेकामी पोलीस निरीक्षक श्री खणदाळे सो यांचे समक्ष हजर झाले. त्यांनी लेखी पत्र देवून पोलीस मदत मिळणेकामी विनंती केल्याने 

सांगोला पोलीस ठाणे कडील सपोनि /सचिन जगताप, पोहवा /१५४७ वजाळे, पोहवा /२६४ क्षीरसागर, पोकों/१७८ पांढरे असे मा पोलिस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करून मदत कामी

 आंध्र प्रदेश पोलीस यांचे सोबत रवाना करण्यात आले. सांगोला पोलीस ठाणे कडील तपास पथक यांनी संशयित ईसम आरोपीचे नाव- गणेश रुपटक्के २६ वर्षे रा.पिंपरी खुर्द ता.आटपाडी याचा तांत्रिक पद्धतिने तसेच कसोशिने शोध घेत असताना 

त्यांना गोपनिय बातमीदार मार्फत संशयित ईसम्म हा सांगोला एस टी स्टॅण्ड व आजुबाजुचे परीसरात दिसुन आल्याची माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन त्यास हटकले असता, 

तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागल्याने त्यास जागीच थांबवुन ताब्यात घेवुन दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कडे एकुन २४५.६५ दॉम वजनाचे सोन्याच्या लगड मिळून 

आल्याने त्या सपोनि सचिन जगताप यांनी तपासकामी जप्त करून संशयित ईसम व मिळून आलेले सोने हे आंध्र प्रदेश राज्यातील पोलीस यांचेकडे पुढील तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची उत्कृष्ठ व उत्तम कामगीरी हि मा. पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, 

मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विकांत गायकवाड साहेब यांचे मार्गदर्शनाखाली 

सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बी. एस. खणदाळे, सपोनि श्री. सचिन जगताप, पोहवा /१५४७ वजाळे, पोहवा /२६४ क्षीरसागर, पोकों/१७८ पांढरे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments