धक्कादायक बातमी.. चिंचोली तलावात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह सांगोला तालुक्यात खळबळ..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:- चिंचोली तलावातील पाण्यावरती तरंगत असताना अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. ही घटना २० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजनेस उघडकीस आली आहे .
याबाबत हरीदास आप्पासो बेहेरे (पोलीस पाटील) चिंचोली यांनी पोलिसात खबर दिली आहे.
सदरचा अनोळखी इसम नेमका कोण?, खून - घातपात की इतर काही याबाबत अनेकांकडून संशय व्यक्त केला जात होता.
तर या घटनेवरून उलट सुलट चर्चा सांगोल्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शुक्रवार दि. २० डिसेंबर रोजी दुपारी ३ वा चे पुर्वी एक अनोळखी पुरुष जातीचे
अंदाजे ४० ते ४५ वयाचे त्याचे उजव्याचे हातावर कृष्णाचे चित्र गोंधलेले होते.
सदर अनोळखी व्यक्ती चिंचोली तलाव्यातील दक्षिण बाजुस पाण्यात सांडव्याचे शेजारी पालते पडलेल्या स्थितीत दिसून आले.
याबाबत ची माहिती मिळताच चिंचोली गावचे पोलिस पाटील हरीदास बेहेरे यांनी सांगोला पोलिसात खबर दिली आहे.
माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून, पुढील घटनेचा तपास सांगोला पोलीस करीत आहेत.


0 Comments