google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अशोक कामटे संघटनेच्यावतीने खा.धनंजय महाडीक यांना रेल्वे मागण्याचे निवेदन कोल्हापूर -कलबुर्गी इंटरसिटी, कोल्हापूर -हैदराबाद रेल्वे सुरू करा:-अशोक कामटे संघटना

Breaking News

अशोक कामटे संघटनेच्यावतीने खा.धनंजय महाडीक यांना रेल्वे मागण्याचे निवेदन कोल्हापूर -कलबुर्गी इंटरसिटी, कोल्हापूर -हैदराबाद रेल्वे सुरू करा:-अशोक कामटे संघटना

अशोक कामटे संघटनेच्यावतीने खा.धनंजय महाडीक यांना रेल्वे मागण्याचे निवेदन


कोल्हापूर -कलबुर्गी इंटरसिटी, कोल्हापूर -हैदराबाद  रेल्वे सुरू करा:-अशोक कामटे संघटना 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४९७८१२)

सांगोला (प्रतिनिधी) सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना, सांगली -कोल्हापूर , 

सोलापूर रेल्वे प्रवाशी संघटना यांच्यावतीने खासदार धनंजय  ऊर्फ मुन्ना महाडिक यांना रेल्वेच्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. प्रामुख्याने या मागण्यात सकाळीं सत्रात कोल्हापूर -कलबुर्गी- 

कोल्हापूर इंटरसिटी रेल्वे सेवा, मिरज- कुर्डूवाडी डेमो रेल्वेचा विस्तार कोल्हापुरपर्यंत करावा, सायंकाळीं 7 च्या सुमारास कोल्हापूर - पंढरपूर- हैदराबाद रेल्वे,कलबुर्गी-कोल्हापूर एक्स्प्रेस या रेल्वेस सलगरे,

 ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव या स्थानकांवर  अधिकृत थांबे मिळावेत, दादर- सातारा सेवा दररोज /नियमीत करावी, कुर्डूवाडी- कोल्हापूर मार्गावर क्रॉसिंग पॉईंटची संख्या वाढवावीत , 

सांगोला स्टेशनवर कोच इंडिकेटर्स बसवावेत , लातूर -कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करावे,कुर्डूवाडी- कोल्हापूर मार्गावर दर 3 तासांनी शटल सेवा दररोज ,नियमीत सुरू करावी. या 

 रेल्वे थांबे व इतर रेल्वेच्या आग्रही मागण्याबाबत निवेदन देण्यात आले. 

या सर्व मागण्याची खासदार धनंजय महाडिक यांनी सकारात्मक चर्चा करून आपण लवकरच रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव यांच्याकडे करणार असल्याचे सांगीतले. 

या निवेदनाच्या प्रती रेल्वे मंत्री भारत सरकार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ,पश्चिम महाराष्ट्रातील सर्व खासदार, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक पुणे, सोलापूर यांनाही देण्यात आले आहेत.

 यावेळी मध्य रेल्वेचे पुणे विभागीय सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी साहेब, निलकंठ शिंदे सर,सुरेश भोसले साहेब यांच्यासह शहीद अशोक कामटे संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट:-

सोलापूर,कोल्हापूर, सातारा, मिरज व सांगली जिल्ह्यातील रेल्वेच्या सर्व समस्या आह्ममी सर्वांनी प्रातिनिधिक स्वरूपात एकत्रित मांडल्या, 

या समस्यांचे निराकरणाकरिता मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, मुंबई यांच्यासमवेत खासदार धनंजय महाडिक मीटिंग घेणार आहे, 

तसेच पुणे, सोलापूर व हुबळी या रेल्वे विभागातील नागरीक,  पश्चिम महाराष्ट्र प्रवासी रेल्वे विकास परिषद  अशोक कामटे संघटनेच्यावतीने आयोजित केली जाणार आहे त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे मागण्या, समस्या कमी होण्यास मदत मिळणार आहे

 व रेल्वे प्रशासनाचे उतपन्न वाढण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळेच रेल्वे प्रशासन, प्रवासी व लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातुन हा अभिनव उपक्रम राबविणार आहे.

निलकंठ शिंदे सर,

संस्थापक अध्यक्ष:- शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना सांगोला

Post a Comment

0 Comments