आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे
हिंदकेसरी पैलवान दिनानाथ सिंह यांनी मानले आभार
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
विधानसभा निवडणुकीमध्ये सांगोला तालुक्यामधून आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाले आणि त्यांची आमदारकीपदी निवड झाली.
त्यांनी विधानसभेमध्ये सांगोला तालुक्यातील अनेक प्रश्नांना वाचा फोडलेली आहे. त्यांनी सांगोला तालुक्यातील अनेक प्रश्न मांडून ते सोडविण्याची मागणी देखील केलेली होती
आणि या मागणीमध्ये त्यांनी हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी पैलवानांचे गेल्या सात-आठ महिन्यांपासून मानधन रखडल्याने उतारवयात हिंदकेसरीना अडचणी निर्माण झालेल्या आहेत.
क्रीडाअधिकारी कार्यालयात त्यांना खेटे मारण्याची वेळ आलेली आहे त्यांना औषधोपचारासाठी किंवा इतर आवश्यक गोष्टींसाठी पैलवानांची परवड होत असल्याचे त्यांनी व्यक्त करत हे मानधन त्वरित देण्याची मागणी केली.
त्यामुळे त्यांच्या या मागणीचे सर्वत्र कौतुकच होत आहे आणि हिंदकेसरी पैलवान दिनानाथ सिंह यांनी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे आभार मानलेले आहेत.
0 Comments