google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज.. जतजवळ मोटारीच्या धडकेत सांगोला तालुक्यातील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू

Breaking News

ब्रेकिंग न्यूज.. जतजवळ मोटारीच्या धडकेत सांगोला तालुक्यातील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू

ब्रेकिंग न्यूज.. जतजवळ मोटारीच्या धडकेत सांगोला तालुक्यातील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

जत : आलिशान मोटारीच्या धडकेत दोघा दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. अजय लिंगप्पा कारंडे (वय 24) 

आणि प्रशांत दत्तात्रय लोखंडे (24, दोघे रा. महीम, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत.जत-शेगाव राज्यमार्गावर

 जतपासून चार किलोमीटरवर ही घटना शुक्रवार, दि. 20 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास रेवनाळ फाट्यावर घडली.

 जत पोलिसांनी मोटारचालक प्रशांत पवार (रा. बारामती) यास ताब्यात घेतले आहे.

महीम येथील अजय आणि प्रशांत कामानिमित्त जत येथे गेले होते. काम आटोपून दोघेही दुचाकीवरून ( एमएच 45 एव्ही 3393) गावाकडे परतत होेते. याचवेळी कर्नाटकात एका लग्न सोहळ्यासाठी निघालेल्या प्रशांत पवार याच्यासह चौघेजण

 मोटारीतून (एमएच 42 बीएन 9993) सांगोल्याहून जतच्या दिशेने येत होेते. जतपासून चार-पाच किलोमीटर वरील रेवनाळ फाट्यावर बस थांब्याजवळ दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली.

 ही धडक इतकी भीषण होती, की दोघेही दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले. काँक्रिटच्या रस्त्यावर आपटल्याने दोघांच्याही डोक्यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला

 व त्यांचा जागीच मृत्यू झाला. मोटारीच्या जोरदार धडकेने दुचाकीचा चक्काचूर झाला. 

मोटारीचेही मोठे नुकसान झाले. मोटारीतील एअर बॅग उघडल्याने मोटारीतील चौघे सुखरूप बचावले.

अपघाताची माहिती मिळताच जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. 

दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठविले. अपघातग्रस्त मोटारीसह चालक प्रशांत पवार याला ताब्यात घेतले. 

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम जत पोलिस ठाण्यात सुरू होते.

दुचाकी दीडशे फूट फरफटत गेली...

दोन्ही वाहने वेगात होती. मोटारीने दुचाकीला धडक देताच, दुचाकी सिमेंटच्या रस्त्यावरून तब्बल दीडशे फुटापर्यंत फरफटत गेली.

 यामुळे दुचाकीस्वार कारंडे व लोखंडे यांच्या डोक्याला, हाताला, पायाला गंभीर मार लागला आणि दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments